कोल्हार ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- जिल्हा परिषदेकडून दिला जाणारा आदर्श ग्रामविकास अधिकारी पुरस्कार यावर्षी कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी शशिकांत अनाजी चौरे यांना जाहीर झाला आहे. या अनुषंगाने कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायत मध्ये ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यामुळे कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा खोवला गेला आहे.
२०२१-२२ चा आदर्श ग्रामविकास अधिकारी म्हणून पुरस्कार जाहीर झाल्याने कोल्हार भगवतीपुर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कोल्हार बुद्रुक मा. सरपंच ऍड सुरेंद्र खर्डे, देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सायजीदादा खर्डे, कोल्हार सरपंच सौ निवेदिता बोरुडे, भगवतीपुर सरपंच दत्तू राजभोज, कोल्हार मा.उपसंरपच ज्ञानेश्वर खर्डे, गोरख खर्डे, देवालय ट्रस्ट विश्वस्त अजित मोरे,
कोल्हार ग्रामपंचायत सदस्य अमोल खर्डे, प्रवरा बँकेचे संचालक राजेंद्र राऊत,पंढरीनाथ खर्डे, अहमदनगर जिल्हा गोल्ड व्हॅल्यूअर्स संघटना जिल्हाध्यक्ष श्रीकांत बेंद्रे, भगवतीपुर मा. उपसरपंच बी के खर्डे, भागवत शेळके, सुधीर खर्डे, प्रवरा कारखान्याचे संचालक दत्तात्रय खर्डे, दिनकर खर्डे,, कोल्हार बुद्रुक सोसायटी संचालक दिलीप शेळके ,संभाजीराजे देवकर, पांडुरंग देवकर, आरपीआयचे सतीश चक्रे व कोल्हार भगवतीपुर मधील समस्थ ग्रामस्थ उपस्थित होते.
माजी सरपंच ॲड. सुरेंद्र खर्डे यावेळी म्हणाले कोल्हारची शिरपेचात या पुरस्काराने आणखी एक मनाचा तुरा खोवला आहे. ग्रामपंचायत कर्मचारी आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडतात. माझ्या कार्यकाळात अनेक ग्रामविकास अधिकारी होऊन गेले मात्र शशिकांत चौरे यांचा मितभाषी स्वभाव, काम करण्याची आणि ती पूर्णत्वास नेण्याची हातोटी उत्तम आहे. ग्रामपंचायत व गांवसाठी अनेकवेळा कठोर निर्माण घ्यावे लागतात मात्र यामध्ये ग्रामस्थ व गांवचा विकास हाच केंद्रबिंदू मानून त्यांनी काम केले. स्वतः जबाबदारी घेऊन ती पूर्णत्वास नेणे हेच त्यांचे उत्तम कौशल्य आहे. त्यांच्या कामाचा अनुभव व सचोटी लक्षात घेत त्यांचेवर अनेक विकासात्मक कामाची जबाबदारी सोपवली आहे त्यात ते नक्कीच यशस्वी होतील व उर्वरित कामे मार्गस्थ होतील अशी अपेक्षा ॲड. सुरेंद्र खर्डे यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कोळसे यांनी केले तर संभाजीराजे देवकर, सरपंच निवेदिता बोरुडे, बी के खर्डे यांनी मनोगत व्यक्त केले.
स्व.इसाक सय्यद यांच्या आठवणींना उजाळा..!
कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतचे कर्मचारी इसाक सय्यद यांनी गत ३५ वर्षे सेवा दिली. पाण्याची भीषण टंचाई असताना त्यांनी योग्य नियोजन केले. गावात कुठे कुठे जोड आहेत किंवा कुठल्यावेळी कुठे पाणी सोडायचे याची त्यांना पूर्ण माहिती होती. ते आज आपल्यात नाहीत मात्र त्यांच्या कामाची आठवण कोल्हार ग्रामपंचायत सदैव ठेवेल अशी भावपूर्ण श्रद्धांजली
ॲड. सुरेंद्र खर्डे पाटील यांनी वाहिली



