spot_img
spot_img

मर्चंट नेव्ही म्हणजे करिअरचा उत्तम पर्याय- ऋषिकेश कुलकर्णी

नगर (जनता आवाज वृत्तसेवा ):-ज्यांना परंपरागत शिक्षणाची चौकट ओलांडून ‘जरा हटके’ करिअरचा विचार असेल त्यांच्यासाठी मर्चंट नेव्ही हा उत्तम पर्याय ठरू शकतो. मर्चंट नेव्हीतील तरूण तरुणींना कमी वयात शाश्वत नोकरीसोबतच उत्तम पगार मिळू शकतो. जगातील बहुतांश व्यापार हा सागरी मार्गाने होतो. मर्चंट नेव्ही मध्ये असणाऱ्या शिप-डेक, इंजिन अशा विभागांमध्ये मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स टेली कम्युनिकेशन या विद्यार्थ्यांना नोकरीच्या खूप साऱ्या संधी या आजही उपलब्ध आहेत आणि भविष्यातही असतील, असे मत श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालया मध्ये आयोजित “ऑपॉर्च्युनिटीज इन मर्चंट नेव्ही” या सेमिनार मध्ये मरिन इंजिनियर श्री ऋषिकेश कुलकर्णी यांनी व्यक्त केले. मर्चंट नेव्ही मध्ये जाण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, नियम व अटी, वेतन, मुलाखतीचे स्वरूप, कामाचे स्वरूप, इत्यादी बद्दल अगदी सविस्तर माहिती सरांनी आपल्या सेमिनारमध्ये दिली.

देशातही मर्चंट नेव्ही संबंधित सरकारी आणि खासगी कंपन्यांमध्ये तरुणांना मोठ्या संधी उपलब्ध असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वाय. आर. खर्डे यांनी दिली. महाविद्यालयातील ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेल मार्फत आयोजित या सेमिनारचा उपयोग ज्या विद्यार्थ्यांना करिअर सेट करायचा आहे त्यांना निश्चितच होईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ट्रेनिंग आणि प्लेसमेंट समन्वयक समन्वयक प्राध्यापिका एस. एम. वाळके यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका ए. आर. माने यांनी केले. महाविद्यालयातील मेकॅनिकल आणि इ अँड टी सी या विभागातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित या कार्यक्रमास प्रा. ए बी काळे, प्रा. जी. बी. साळुंके, प्रा. अमेय कुलकर्णी तसेच सर्व विभागाचे ट्रेनिंग प्लेसमेंट समन्वयक उपस्थित होते. सेमिनार झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असणाऱ्या शंकांचे निरसन कार्यक्रमास लाभलेले पाहुणे श्री. ऋषिकेश कुलकर्णी यांनी प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!