spot_img
spot_img

भागीरथी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कारगिल विजय दिन साजरा

 वैजापूर( जनता आज वृत्तसेवा ):- वैजापूर तालुक्यातील नालेगाव येथील विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भागीरथी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य बी.एम हजारे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक दत्तात्रय सुरासे, प्रमोद पठारे यांची उपस्थिती होती. यावेळी वड , पिंपळ,सिताफळ, कडूलिंब यासारख्या विविध प्रजातीचे वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या स्मृति कायम आठवणीत रहाव्या व शहीद जवानांना खरीखुरी श्रद्धांजली अर्पण व्हावी तसेच त्यांनी दिलेले देशासाठी बलिदान विद्यार्थ्यांच्या कायम लक्षात रहावे म्हणून कारगिल विजयदिनानिमित्त वृक्षारोपण केलेल्या रोपट्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन विद्यार्थी व विद्यार्थिनीना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत भोपळे यांनी केले तर आभार भरत निंबाळकर यांनी मानले.
        
याप्रसंगी प्रमोद चव्हाण, राजेश्वर विभुते, गणेश जगताप, प्रवीण जाधव, प्रमोद रिंढे, त्र्यंबक गावडे, श्रीमती मनीषा उभेदळ, सागर राजपूत, श्रीमती निर्मला शिरसाट, गंगाधर कटारे, गोकुळ पवार, योगेश शिंदे, श्रीमती जयश्री बोर्डे, सुरज साळवे, अधिक्षक श्रीमती मंजूषा सुरासे आदी उपस्थित होते , तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षकेत्तर कर्मचारी समाधान सुरासे, सुनील बोडखे, किशोर साळुंखे, ज्ञानदेव तायडे, भगवान सुरासे, उत्तम सरोवर, विशाल साबळे, अमोल त्रिभुवन यांनी परिश्रम घेतले.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!