spot_img
spot_img

“वाहनाच्या धडकेत एक जण जागीच ठार” मयत युवक ॲड. काॅ.बन्सी सातपुते व काॅ.स्मिता पानसरे यांचा एकुलता एक मुलगा

नेवासा फाटा( जनता आवाज वृत्तसेवा):- नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथे नेवासा-शेवगाव राज्यमहामार्गावर व्यंकटेश ज्वेलर्स दुकानासमोर उस वाहतूक करणारा डबल ट्रेलरचा ट्रॅक्टर-स्कार्पिओ-स्कुटी अशा तीन वाहनांच्या अपघातात स्कुटीवरील अमित बन्सी सातपुते ( वय ३३ वर्षे ) रा.नजीक चिंचोली ता.नेवासा हा युवक जागीच ठार झाल्याची घटना दि.२२ रोजी रात्री ८.३० वाजेचे सुमारास घडली. 

स्कुटीला धडक देणाऱ्या ट्रॅक्टर चालकास पोलीसांनी पकडले असता त्याने सांगितले की, स्कार्पिओने धडक देऊन चालक गाडीसह पसार झाला आहे. तर काहीनी स्कार्पिओ गाडी पळुन जाताना बघीतली आहे. ही गाडी भातकुडगाव फाट्यावर पकडल्याची चर्चा नागरिक करत होते.

मयत अमित हा प्रसिद्ध वकील अड. काॅ. बन्सी सातपुते व सामाजिक कार्यकर्त्या काॅ.स्मिता पानसरे यांचा एकुलता एक मुलगा आहे.

मृतदेह शव विच्छेदनासाठी नेवासा फाटा येथील ग्रामिण रुग्णालयात आनण्यात आला आहे. अमित याच्या डोक्यावरुन वाहनाचे चाक गेल्याने तो जागीच ठार झाल्याचे सांगितले जात आहे.

 

 

 

 

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!