spot_img
spot_img

दत्तनगरमध्ये सरपंच पदासाठी तिरंगी फाईट ; विखे गटांकडून रोजलीन निकम ; ससाणे गटांकडून  सारिका कुंकूलोळ तर वंचित कडून योगिता क्षीरसागर ;   सदस्य पदासाठी 46 जणांची उमेदवारी, आजपासून प्रचाराचा धुराळा उडणार

टिळकनगर (जनता आवाज वृत्तसेवा):-तालुक्यातील दत्तनगर ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी जोमाने सुरू असून काल उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी इच्छुकांची चांगलीच झुंबड उडाली, थेट मिनी आमदारकी म्हणून पाहिल्या जात असलेल्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नानासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विखे गटांकडून रोजलीन निकम ; जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य बाबासाहेब दिघे यांच्या नेतृत्वाखाली ससाणे गटांकडून सारिका कुंकूलोळ तर नागेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीकडून योगिता क्षीरसागर निवडणूक रिंगणात आहे.

तर सदस्य पदासाठी निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्याही कमालीची वाढली आहे. काल झालेल्या उमेदवारी माघारीच्या दिवशी सदस्य पदासाठी 46 उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशीब अजमावणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ठाकरे यांनी दिली. तालुक्यातील हाकेच्या अंतरावर असलेल्या दत्तनगर गावात निवडणूक वातावरण उद्यापासून प्रचारमय होणार असल्याने दुसऱ्यांदा लोकनियुक्त सरपंच कोण होणार ? सत्ताधारी पक्षाला सत्ता टिकविण्यास यश येणार की, परिवर्तन होणार याकडे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील नजरा यावर टिकून आहे.

सरपंच पदासाठी सारिका कुंकूलोळ, रोजलीन निकम, योगिता क्षीरसागर तर सदस्य पदासाठी प्रभाग क्रमांक एक मध्ये संजय बोरगे, रोहीदास माघाडे, नागेश क्षिरसागर यांच्यात तिरंगी लढत व  दर्शना काळे, शालिनी मगर, आम्रपाली विघे यांच्यातही तिरंगी लढत होईल.

प्रभाग क्रमांक दोन मध्ये एकनाथ गायकवाड, राजेंद्र मगर, नागेश क्षिरसागर यांच्यात लढत तर राणी खाजेकर, लक्ष्मीबाई बत्तीसे, योगिता क्षीरसागर यांची लढत तर शाकेरा बागवान, मयुरी बागुल, जिजाबाई रणयेवते ही तिरंगी लढत

प्रभाग क्रमांक 3)-

सनी त्रिभुवन, सागर भोसले, सुनील शिरसाठ यांची लढत तर प्रीती ब्राह्मणे व सोनूबाई लोंढे ह्यांची समोरासमोर लढत तर हिरालाल जाधव व सुनील शिंदे यांची लढत

प्रभाग क्रमांक 4)-

लक्ष्मण कडवे व सचिन भोसले लढत तर प्रेमचंद कुंकलोळ, अरुण खरात, सोपान मोरगे यांची तिरंगी लढत तर उज्वला भणगे व नयना शेवाळे समोरासमोर लढत

प्रभाग क्रमांक 5)-

प्रदीप गायकवाड, गौरव पठारे, गौरव बागुल ही तिरंगी लढत व भारती आव्हाड, उषा कदम, वैशाली जगताप ही तिरंगी लढत तर मंदा पठारे व सूननयना शिवलकर समोरासमोर लढत

प्रभाग क्रमांक-6)-

सचिन खांडरे, विशाल पठारे, भीमराज बागुल, अरुण वाघमारे ह्यांची चौरंगी लढत तर राजश्री खंडागळे, माधवी जगताप, भाग्यश्री ब्राह्मणे ही तिरंगी लढत तर कुसुम बाई जगताप व वर्षा त्रिभुवन समोरासमोर लढत होणार आहे.

गावचे कारभारी निवडण्याची प्रक्रिया म्हणजे ग्रामपंचायत निवडणूका यासाठी विविध पक्ष व गट ग्रामपंचायत आपल्या ताब्यात घेण्यासाठी व मतदारांना आकर्षीत करण्यासाठी प्रचाराचे विविध प्रकारचे फंडे वापरून प्रचाराची राळ उडवनार आहे. त्यामुळे दत्तनगर गावांत प्रचाराचा वेग प्रचंड वाढलेला पाहावयास दिसणार आहे. येणाऱ्या 5 नोव्हेंबरला मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावून गावचे कारभारी कोण असतील हे ठरवतील.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!