राहाता (जनता आवाज वृत्तसेवा):- राहाता शहरातील सहकारात अग्रेसर असणारी धन्वंतरी महिला नागरी सहकारी पतसंस्था नेहमीच गरजू व होतकरू महिलांना संकटात आर्थिक पाठबळ देते या पतसंस्थेचे महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यात मोठे योगदान आहे गृह उद्योग अथवा महिला पूरक उद्योग व्यवसाय उभारणीसाठी महिलांना वेळेत कर्जपुरवठा करणारी पतसंस्था म्हणून धन्वंतरी नागरी महिला पतसंस्थेचा लौकिक आहे त्यामुळेच ही पतसंस्था राहाता शहरासह परिसरातील महिलांचा आर्थिक आधारस्तंभ बनली आहे असे प्रतिपादन रणरागिनी महिला मंच अध्यक्ष सौ धनश्रीताई विखे पाटील यांनी केले
राहाता येथील धन्वंतरी नागरी महिला सहकारी पतसंस्थेचे नूतन कार्यालयात स्थलांतर झाले या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून रणरागिणी महिला मंचच्या अध्यक्षा सौ धनश्रीताई विखे पाटील बोलत होत्या याप्रसंगी धन्वंतरी नागरी महिला सहकारी पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षा राहाता नगर परिषदेच्या माजी नगरसेविका तथा संस्थेच्या चेअरपर्सन डॉ सौ मंगलाताई गाडेकर तसेच संस्थेच्या व्हाईस चेअरपर्सन छायाताई निसळ संचालिका उषा दंडवते सुवर्णा कोल्हे अलका गाडेकर प्रमिला भुजबळ पौर्णिमा गांधी अशा बनकर छाया रणमाळे मनीषा मेहेत्रे अलका कांबळे आदी मान्यवर महिला संचालिका उपस्थित होत्या
याप्रसंगी सौ धनश्री ताई विखे पाटील म्हणाल्या की संस्थेच्या चेअरपर्सन डॉ सौ मंगलाताई गाडेकर यांनी सर्व महिला भगिनींना एकत्रित करून होतकरू व गरजू महिलांना आर्थिक पाठबळ देता यावे त्याचबरोबर त्यांना स्वावलंबी बनवता यावे या उद्देशाने धन्वंतरी महिला नागरी संस्थेची स्थापना केली पुरुषांप्रमाणेच महिला भगिनी सुद्धा अत्यंत चांगल्या व प्रभावीपणे पतसंस्थांचा कारभार करू शकतात याचा वस्तू पाठ पतसंस्थेच्या चेअर पर्सन डॉक्टर सौ मंगलाताई गाडेकर व त्यांच्या सहकारी संचालिका भगिनींनी दिला आहे राहता शहरातील छोट्या मोठ्या व्यावसायिकांची आर्थिक पत सुधारण्याचे व त्यांना आर्थिक बचतीचे व शिस्तीचे धडे या पतसंस्थेने दिले ही एक चांगली बाब आहे या पतसंस्थेचा भविष्यकाळ उज्वल असल्याचे यावेळी सौ धनश्रीताई विखे पाटील यांनी सांगितले
यावेळी पतसंस्थेच्या चेअरपर्सन डॉ. सौ. मंगलाताई गाडेकर संस्थेची माहिती देताना म्हणाल्या की, संस्था स्थापनेपासून ऑडिट वर्ग ‘अ’ घेत आलेली असून या संस्थेच्या एकूण सभासद १०१७ महिला आहेत. संस्थेच्या एकूण ठेवी ७ कोटी १६ लाख आणि कर्जवाटप ५ कोटी ४० लाख आहे. एकूण भागभांडवल ९ कोटी ७० लाख आणि गुंतवणूक ३ कोटींची आहे. संस्थेचा स्वनिधी ४० लाख तर खेळते भांडवल ८ कोटी ४० लाख आहे.
यावेळी संस्थेच्या व्हाइस चेअरपर्सन सौ. छायाताई निसळ, संचालिका उषा दंडवते, सुवर्णा कोल्हे, अलका गाडेकर, प्रमिला भुजबळ, पौर्णिमा गांधी, आशा बनकर, छाया रनमाळे, मनीषा मेहेत्रे, अलका कांबळे यांनी धनश्रीताई विखे पाटील, यांचे स्वागत केले.
यावेळी डॉ. के. वाय. गाडेकर धन्वंतरी पतसंस्थेचे चेअरमन डॉ स्वाधीन गाडेकर यांना अहमदनगर जिल्हा पतसंस्था स्थैर्यनिधी तर्फे दिला जाणारा युवा प्रोत्साहन पुरस्कार २०२३ मिळाल्या बद्दल सौ. धनश्रीताई विखे पाटील यांनी डॉ. स्वाधीन गाडेकर यांचा सत्कार केला.
याप्रसंगी संस्थेचे मार्गदर्शक व माजी नगराध्यक्ष डॉ के. वाय. गाडेकर, सहकार खात्याचे अधिकारी राजेंद्र सदाफळ, गणेशचे माजी चेअरमन मुकुंद नाना सदाफळ, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, रघुनाथ बोठे, गणेश चे माजी संचालक रघुनाथ गाडेकर, मोहनराव सदाफळ, कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक दिलीप गाडेकर, साहेबराव निधाने, नानासाहेब बोठे, डॉ. संतोष मैड,भाऊसाहेब चौधरी, साईयोगा फाऊंडेशन चे डॉ. बापूसाहेब पानगव्हाणे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सर्जेराव मते, गणेश चे संचालक भगवान टिळेकर, संपत हिंगे,नितीन भडांगे, चंद्रभान मेहेत्रे, सुनील सदाफळ, साहेबराव गाडेकर, सुरेश गाडेकर, भागुनाथ गाडेकर, चांगदेव गाडेकर, पोपटराव कोल्हे, दशरथ तुपे, किरण वाबळे, अरुण मेहेत्रे, राधाकीसान भुजबळ, व्यवस्थापक संतोष माळवदे, सचिन मेहेत्रे, अविनाश त्रिभुवन आदी उपस्थित होते.




Total Users : 631647