spot_img
spot_img

टाकळीभान येथील सकल मराठा समाज व समस्त ग्रामस्थ यांचे वतीने येथील तलाठी कार्यालयासमोर साखळी उपोषण टाकळीभान ग्रामपंचायत चार सदस्यांचा राजीनामा

टाकळीभान, ( जनता आवाज वृत्तसेवा ):- श्रीरामपूर तालुक्यातील  टाकळीभान, येथे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून त्यांचा ओबीसी मध्ये समावेश करावा या मागणीसाठी तसेच संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांचे सुरू असलेल्या आमरण उपोषणास पाठींबा देण्या करीता सकल मराठा समाज व समस्त ग्रामस्थ यांचे वतीने येथील तलाठी कार्यालयासमोर रविवार दि.२९ रोजी सकाळी १० वाजता. साखळी उपोषणास सुरूवात करण्यात आली.

गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून त्यांचा समावेश ओबीसी मध्ये करण्यात यावा. या मागणीसाठी संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी सरकार विरूध्द एल्गार पुकारला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले असून अंतरवाली सराटी या ठिकाणी ते आमरण उपोषणास बसले आहे.

सरकारला ४० दिवसाची मुदत देवूनही सरकारकडून आरक्षणाबाबत कुठलेही पाऊल उचलले न गेल्याने जरांगे पाटील हे पुन्हा आमरण उपोषणास बसले आहे. सध्या त्यांची प्रकृती खालावली आहे. अशा परिस्थितीतही शासनाला जाग येत नसल्याने काल रविवार दि.२९ पासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जरांगे पाटील यांना पाठींबा देण्यासाठी साखळी उपोषणे सुरू झाली आहे.तसेच ठिकठिकाणी नेत्यांना गावबंदी केली जात आहे. टाकळीभान येथेही नेत्यांना गावबंदी करण्यात आली असून सकल मराठा समाज व समस्त ग्रामस्थांनी साखळी उपोषणास सुरूवात केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करून साखळी उपोषणास सुरूवात करण्यात आली. यावेळी स्थानिक पातळीवरील सर्वपक्षीय पुढार्‍यांनीही या उपोषणास पाठींबा दर्शविला असून मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी शासनाकडे केली आहे.

यावेळी मोठ्या संख्येने सकल मराठा समाज व समस्त टाकळीभान ग्रामस्त उपस्थित होते. यावेळी जय भवानी जय शिवाजी, भारत माता की जय, एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला होता.

मराठी  समाज आरक्षण मिळण्यासाठी टाकळीभान ग्रामपंचायतच्या चार सदस्यांचा राजीनामा.टाकळीभान येथे मराठी समाजास आरक्षण मिळण्यासाठी साखळी उपोषण सुरू करण्यात आले असून आरक्षण मिळण्यासाठी येथील ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच कान्हा खंडागळे, अशोक कचे, सदस्या दिपाली खंडागळे, कविता रणनवरे या चार सदस्यांनी आपल्या पदाचा राजीनामा आरक्षण समितीकडे दिला आहे.

सकल मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तो पर्यंत सर्व पक्षातील नेते व पुढाऱ्यांना टाकळीभान गावात बंदी आहे असे फलक गावाच्या कमाणीलाच बांधून पुढाऱ्यांना गावात बंदी असल्याचे सकल मराठा समाजाकडून ठनकावून सांगण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!