नेवासा फाटा( जनता आवाज वृत्तसेवा ):- दिल्ली सुप्रीम कोर्ट ऍड ऑनरेकॉर्ड झालेल्या परीक्षेत सागर पाहुणे पाटील यांनी टॉप पंधरामध्ये उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळवला आहे.या यशाबद्दल सागर पाहुणे पाटील यांचा नेवासा येथे झालेल्या कार्यक्रमात गौरव करण्यात येऊन भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
मूळचे गंगापूर येथील रहिवासी असलेले सागर पाहुणे पाटील यांचा नेवासा येथे मित्र परिवाराचा मोठा गोतावळा आहे,दिल्ली सुप्रीम कोर्टच्या ऑनरेकॉर्ड सारख्या अवघड परीक्षेत सागर पाटील यांनी यश संपादन केल्याबद्दल त्यांचे पेढा भरवून व फटाक्यांची आतषबाजी करत स्वागत करण्यात आले.सागर पाहुणे पाटील हे आमदार शंकरराव गडाख यांचे नेवासा येथील स्वीय सहायक सुनील जाधव यांचे बंधु आहेत.
सागर पाहुणे पाटील यांच्या यशाबद्दल त्यांचे माजी जलसंधारण मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्यासह आमदार शंकरराव गडाख मित्र मंडळ यांनी अभिनंदन केले आहे.




Total Users : 617094