आश्वी दि.११ ( जनता आवाज
वृत्तसेवा ):-सर्वाना बरोबर घेऊन काम करतांना सर्वाना समान न्याय हिच भूमिका असल्याने अनेक राजकीय वादळे येऊन ही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा मंडळ हे आपले संघटन अधिक मजबूत होत जनतेची सेवा करत आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील आश्वी मंडळातील प्रवरा सहकहरी बँकेच्या उपाध्यक्षपदी मच्छींद्र थेटे, संचालक बबनराव काळे, माधवराव गायकवाड, बापुसाहेब गायकवाड, अजयराव ब्राम्हणे,बाजीराव खेमनर या नुतन पदाधिका-याचा आश्वी परिसरांच्या वतीने आयोजित नागरी सत्कार कार्यक्रमात सौ. विखे पाटील बोलत होत्या. यावेळी जेष्ठ मार्गदर्शक यावेळी मांची हिल शैक्षणिक संकुलचे संस्थापक शालीग्राम होडगर, विखे पाटील कारखान्याचे संचालक विनायक बालोटे, माजी जिल्हा परिषद सदस्या अँड रोहीनीताइ निघुते, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक भाऊसाहेब ज-हाड, पोपटराव वाणी, रामभाऊ भुसाळ, अण्णासाहेब म्हस्के,पोपटराव उंबरकर,अशोक ज-हाड,नारायण कहार,प्रतापराव तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात सौ. विखे पाटील
म्हणाल्या, सर्वाना न्याय देत सर्वाना बरोबर घेऊन काम करणारे जनसेवा मंडळ आहे. चांगल्या कामातून आपल्या संस्था प्रगती करत आहेत. पद्मभूषण डॉ. बाळासाहेबांचे विखे पाटील यांचे विचार घेऊन सर्वसामान्य जनतेसाठी काम होत आहे. प्रत्येकाला पदाच्या माध्यमालून न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्या गावातील मतभेद बाजूला ठेऊन काम करा. गावचा एकोपा कायम ठेवा. आपण सर्वजण एक कुंटुंब म्हणून काम करत आहोत. आजपर्यत सर्वच संस्थामधून आपले काम आदर्श राहीले असुन पदाच्या माध्यमांतून सर्व सामान्य जनतेला न्याय द्या असे सांगतांनाच गणेश सहकारी कारखाना निवडणुकीतही आपल्याचं विजय होणार असे सांगत मतभेद करुन नका संघटीत रहा असे आवाहन केले .
यावेळी जेष्ठ मार्गदर्शक शालीग्राम होडगर यांनी शिर्डी मतदार संघासह राज्यात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदर्श कामामुळे अनेक निर्णय लोकाभिमुख ठरत असल्याचे सांगितले. यावेळी मच्छींद्र थेटे, माधवराव गायकवाड यांनीही आपली मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायकराव बोलोटे यांनी तर आभार भाऊसाहेब ज-हाड यांनी मानले.
राज्य आणि केंद्र सरकार हे चांगले काम करत आहे.हे काम जनतेपर्यत पोहचवा विविध योजनेतून जनतेला आधार द्या.आपले संघटन हिच आपली ताकद आहे.असे सौ.विखे पाटील यांनी सांगितले.



