spot_img
spot_img

बोगस बियाणे विकणाऱ्यांना यापुढे 10 वर्षाची शिक्षा, असा कायदा लवकरच पास करणार – कृषी मंत्री अब्दुल सत्तार

मुंबई (जनता आवाज वृत्तसेवा):- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची पेरणी हंगामात बोगस बियाणे देऊन फसवणूक केली जाते. अशा घटना अनेक वर्षापासून महाराष्ट्रात घडत आहे. त्यामुळे युती सरकारने  बोगस बियाणे विकणाऱ्यांबाबत शिंदे-फडणवीस सरकराने मोठा निर्णय घेतला आहे.

यापुढे बोगस बियाणे विकणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा होणार असून, यासाठी येत्या अधिवेशनात कायदा आणला जाणार असल्याची घोषणा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे.
ज्यांच्याकडे बोगस बियाणे अथवा बोगस औषधे असतील, किंवा खते असतील त्यांनी तत्काळ नष्ट करावे. अन्यथा राज्यपाल यांच्याकडे मी पूर्ण रिपोर्ट देणार असून, त्यांच्यावर अंतिम निर्णय झाल्यावर त्या बोगस माल विकणाऱ्यांवर किमान 10 वर्षांची शिक्षा झाली पाहिजे असा कायदा येत्या अधिवेशनात आणला जाणार असल्याचे सत्तार म्हणाले आहेत.
 अशा कायद्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची बोगस बी बियाणे मार्केटमध्ये आणून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या वर मोठ्या प्रमाणात आळा बसेल 
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!