अहमदनगर (जनता आवाज वृत्तसेवा):- नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या २५ व्या स्थापना वर्षानिमित्त केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ श्रीमती भारती पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व डॉ श्रीमती अरुणा वनीकर, अध्यक्ष, पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण मंडळ, राष्ट्रीय विज्ञान आयोग, नवी दिल्ली यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित रौप्य महोत्सव निमित्ताने अहमदनगर येथील डॉ विठ्ठलराव विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालयास “सर्वोत्कृष्ट वैद्यकीय महाविद्यालय” पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अहमदनगर येथील डॉ विठ्ठलराव विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालयास “सर्वोत्कृष्ट वैद्यकीय महाविद्यालय” पुरस्कार प्रदान
सदर पुरस्कार संस्थेच्या वतीने संचालक (वैद्यकीय) प्रा. डॉ. अभिजित दिवटे व महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा.डॉ. सुनील म्हस्के यांनी स्विकारला.
या प्रसंगी म.आ.वि. वि. कुलगुरू ले. जन.(नि.) डॉ माधुरी कानिटकर, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, मुंबई चे संचालक व माजी कुलगुरू प्रा.डॉ.दिलीप म्हैसेकर, म.आ.वि. वि. चे सर्व माजी कुलगुरू डॉ. मृदुला फडके, डॉ नीलिमा क्षीरसागर, डॉ अरुण जामकर तसेच म.आ.वि. वि.चे प्र-कुलगुरू डॉ मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ संदीप कडू हेही उपस्थित होते.



