कल्याण (जनता आवाज वृत्तसेवा):- अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये कुठे व कधी कसे घडेल हे सांगता येत नाही. कारण भाजप व शिंदे गटात सुद्धा सर्व काही अलबेला असे सारखे दाखवतात. परंतु त्यांच्या सुद्धा वादाची ठिणगी पडतआहे.
कल्याण लोकसभा मतदार संघात भाजपा कार्यकर्ते सांगतील, तोच उमेदवार मान्य केला जाईल. अन्य कोणी उमेदवार सहन केला जाणार नाही, अशी भूमिका भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यावर “कुणाच्या पोटदुखीतून युतीत विघ्न निर्माण झालं असेल तर माझ्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी आहे, ” असं मत खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.



