spot_img
spot_img

श्रीरामपूर बाजार समितीत अवघ्या 30 रुपयात शेतकऱ्यांना भोजन सुरू – सभापती सुधीर नवले

श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा ):- श्रीरामपूर बाजार समितीने अवघ्या 30 रुपयात शेतकऱ्यांना भोजनाची व्यवस्था कालपासून सुरू केल्याची माहिती सभापती सुधीर नवले यांनी दिली.

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्वर्गीय जयंतराव ससाणे यांच्या संकल्पनेतून पाच-सहा वर्षांपूर्वी शेतकरी भोजनालय सुरू केले होते. परंतु मागील तीन-चार वर्षांपासून सदरचे भोजनालय बंद होते. आपण पदभार स्वीकारल्यानंतर करण ससाणे व सचिन गुजर यांनी भोजनालय सुरू करण्याची सूचना दिल्या होत्या.

 गुरुवारी कोणत्याही उद्घाटन न करता शेतकऱ्यांना 30 रुपयात दोन भाज्या दोन चपाती व  वरणभात  असे जेवण सुरू करण्यात आले. कांदा विक्रीसाठी वैजापूर व गंगापूर तसेच गोदाकाठाची  शेतकरी येत असतात. ते सकाळी सहा वाजता कांदा घेऊन सुमारे 400 ते 500 वाहने दुपारी लीला होऊन वाणी खाली होईपर्यंत मार्केट कमिटी मध्ये थांबतात. या कालावधीमध्ये त्यांना जेवणाची सोय कुठेही नव्हती. ती सोय गुरुवारपासून सुरू करण्यात आली असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे असे सभापती सुधीर नवले यांनी सांगितले.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!