spot_img
spot_img

औरंगजेब चे स्टेटस ठेवल्यामुळे आष्टी मधील तरुणावर गुन्हा दाखल

आष्टी  (जनता आवाज वृत्तसेवा ):- सध्या नगर व औरंगाबाद जिल्ह्यामध्ये औरंगजेब स्टेटस वरून काढलेला सकल हिंदू मराठा मोर्चा यानंतर झालेला दगडफेकीमुळे निर्माण झालेला तणाव त्यामुळे पोलीस प्रशासन अधिक प्रमाणात सतर्क झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरात औरंगजेबाचं वादग्रस्त स्टेटस ठेवल्याने रात्रीपासून तणावाचे वातावरण असून पोलिसांनी रात्री उशिरा याप्रकरणी संबंधीत तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी केलेल्या आवाहनानंतर आज, ९ जून रोजी आष्टी येथे बंद पाळण्यात आला आहे. या स्टेटसमुळे दोन्ही समाजात तेढ निर्माण झाल्याची तक्रार आष्टी पोलिसांकडे देण्यात आली आहे.

यापूर्वी घडलेल्या घटनांप्रमाणे आष्टी येथील एका तरुणांने औरंगजेबाचं स्टेटस ठेवलं होतं. ही बाब दुसऱ्या तरुणांच्या लक्षात आल्यानंतर लोका पोलिस स्टेशनमध्ये पोहचसे. अखेर रात्री उशीरा आष्टी पोलिस स्टेशनमध्ये संबंधीत तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी शहर बंदची घोषणा केली त्यानंतर आजा आष्टी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. या प्रकरामुळे शहरात तणावपूर्ण शांतत असून पोलिस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
पोलीस प्रशासनाकडून महाराष्ट्रातील जनतेला कुठल्याही प्रकारच्या अफवा अथवा भूलथापांना बळी पडू नये असे आव्हान केलेले आहे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!