लोणी दि.५ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-पर्यावरणाचा समतोल राहीला तर बदलल्या हवामानावर मात करता येईल यासाठी वृक्ष लागवड करण्याची गरज आहे असे प्रतिपादन प्रवरा माध्यामिक विद्यालयाचे श्री.सखाहरी सोनवणे यांनी केले.
पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या दुर्गापूर येथील प्रवरा माध्यामिक विद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित वृक्षारोपण प्रसंगी श्री.सोनवणे बोलत होते. प्राचार्या सौ.संध्या रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमास सहशिक्षक संजय लहामगे, श्री.नाना पोटे,श्री.भानुदास शिंदे श्री.संजय लहामगे श्री.मच्छींद्र जरे,सौ,सुनंदा दळे सौ.गायत्री तांबे आदी उपस्थित होते.
प्रवरेचा शैक्षणिक संकुलात विविध संणवार उत्सव साजरे करतांना विद्यार्थ्यांना आपली संस्कृती आणि निसर्गाशी नाते निर्माण करण्यावर भर असतो असे श्री.सोनवणे यांनी सांगून गुणवत्तापुर्ण शिक्षण आणि सक्षम नागरीक घडवितांना शिक्षणासोबतचं अनेक उपक्रम सुरू असतात आज निसर्गात बद्दल झाल्याने समस्या वाढला आहेत यासाठी पर्यावरण संवर्धन करा हा संदेश त्यांनी वृक्षारोपण कार्यक्रमातून दिला.



