महसूल आणि पालक मंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शना खाली कृषी विभाग आत्मा अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर येथे पर्यवारणपूरक जीवन पद्धती अभियान सप्ताहाचा समारोह समारंभ निमित्त श्री.नलगे बोलत होते.यावेळी आत्माचे उपसंचालक राजाराम गायकवाड,केंद्राचे प्रमुख शास्ञज्ञ शैलेश देशमुख,डाॅ.विठ्ठल विखे,राहाता तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे प्रगतशील शेतकरी श्री.सुभाष करीर, श्री मच्छिंद्र घोलप आदी मान्यवर उपस्थित होते.
पर्यावरणपुरक शेती तंत्रज्ञान ही काळाची गरज .. विलास नलगे पर्यावरण पुरक जीवन पद्धती अभियान सप्ताहाचा समारोह
लोणी दि.२८ (प्रतिनिधी):-बदलत्या हवामानाशी सुसंगत शेती यापुढे करावी लागणार आहे.पर्यावरणपुरच शेती तंञज्ञान अवगत करुन शेतक-यांनी निसर्गाशी स्पर्धा न करता निसर्ग आणि पर्यावरण समजून घ्यावे असे प्रतिपादन आत्माचे प्रकल्य संचालक विलास नलगे यांनी केले.
प्रकल्प संचालक श्री नलगे यांनी पौष्टिक तृणधान्यचे आहारातील महत्व! भविष्यातील वाव आणि काळाची गरज बाबत मार्गदर्शन करतांना शेतकऱ्यांनी पर्यावरणपुरक शेतीतंत्रज्ञानाचा वापर करावा यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन पर्यावरणाचा रासायनिक खते व औषधे या मुळे होणारा ऱ्हास कमी होईल असे सांगिलले. राजाराम गायकवाड साहेब यांनी प्रक्रिया उद्योगबाबत तसेच सेंद्रिये शेती विषयी मार्गदर्शन केले. शैलेश देशमुख यांनी सोयाबीन पिकातील लागवद व्यवस्थपन या विषयावर मार्गदर्शन केले तर डॉ. विखे यांनी दुग्ध जनावरांच्या आहाराबबत् मार्गदर्शन केले. बापूसाहेब शिंदे यांनी प्रास्ताविक केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी आत्माचे किशोर कडू व राजादत्त गोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.



