26.6 C
New York
Tuesday, June 24, 2025

Buy now

spot_img
spot_img

सहकारमहर्षी पद्मश्री विखे पाटील शेती, सहकार, शिक्षण, औद्योगिक प्रगत महाराष्ट्राचे युगप्रवर्तक- डॉ सुजय विखे पाटील

लोणी (जनता आवाज वृत्तसेवा ):-सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांची १२४ वी जयंती सोहळा राहाता तालुक्यातील लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे साजरा करण्यात आला. या जयंती सोहळ्याचे औचित्य साधून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज, प्रवरा परिसराचे भाग्यविधाते सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्यातील तैलचित्रांचे अनावरण, खोखो क्रीडांगणाचे उद्घाटन तसेच विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी मा. डॉ सुजय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते व मा. डॉ राजेंद्र कोबरणे  यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

सहकारमहर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकार चळवळीचे बीज रोवून समाजातील सर्व वर्गाला ख-याअर्थाने आधार निर्माण करुन दिला. सहकार चळवळ ही शेतक-यांची असली तरी या चळवळीने ग्रामीण भागाच्या परिवर्तनात निर्माण केलेले स्थान खुप महत्वपूर्ण आहे. सहकारातून निर्माण झालेली शिक्षण व्यवस्था ही ग्रामीण भागातील मुलांच्याु उत्कर्षासाठी महत्वपूर्ण ठरली आहे. समाजातील सर्व मुलांना केजी पासून ते पी जी पर्यतचे शिक्षण सुरु झाल्याामुळेच आज लाखो विद्यार्थी या शैक्षणिक संकुलातून देशाच्या कानाकाप-यात आपले यश सिध्द करुन दाखवित आहेत. हीच सहकार चळवळीची यशस्वी‍ता असल्याचे डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले . ग्रामीण भागाच्या समृद्धीकरीता पद्मश्रींनी दिलेला संदेश पुढे घेवून जाण्यांचे काम या पिढीला करावे लागेल. पद्मश्रींनी शेती सहकार शिक्षण औद्योगिक विकास यामधील असणारे योगदान विद्यार्थ्यांसमोर मांडताना पद्मश्री चे जीवन कसे प्रेरणादायी आहे व कष्टाशिवाय यश नाही हे विद्यार्थ्यांना पटवून दिले. पद्मश्री विखे पाटील सारखे नेत्रदीप यश संपादन करण्याविषयी विद्यार्थ्यांना प्रेरित केले.

श्री उमेश  घोलप (सरपंच ग्रामपंचायत पाथरे बु) यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज, तर   नामदेव तांबे  यांनी पद्मश्री विखे पाटील व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचे तैलचित्र तसेच कॉन्टॅक्टर मा. श्री सागर सुरेश घोलप यांनी महाविद्यालयास ६ फॅन सप्रेम भेट म्हणून दिले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य श्री बारगुजे  यांनी केले. या कार्यक्रमास आबासाहेब  घोलप (उपाध्यक्ष स्थानिक स्कूल कमिटी) .उमेश घोलप (सरपंच ग्रामपंचायत पाथरे बु) गंगाधर  घोलप (संचालक, प्रवरा बँक) आण्णासाहेब  कडू (उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राहाता) मा.भाऊसाहेब बाबुराव पा घोलप (माजी संचालक प्रवरा स. सा. कारखाना)  अशोक  कडू, दिनकर  घोलप,शिवाजी  घोलप,  आरिफभाई शेख (उपसरपंच पाथरे बु)  नामदेव तांबे  . सोपान घोलप,  रायभान सिनारे,बाळासाहेब  घोलप,राजेंद्र  घोलप,ज्ञानेश्वर  कडू , सयाजी  कडू, किशोर  कडू  अशोकराव  घोलप, सत्यजित  घोलप, प्रवीण  घोलप, दत्तात्रय  कडू. मुस्ताक  शेख, शिराज शेख, नंदकिशोर कडू, शिवाजी  घोलप, दिलीप घोलप, राजेंद्र घोलप आदींसह शिक्षक- शिक्षिका, विद्यार्थी- विद्यार्थिनी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!