spot_img
spot_img

वांबोरी चारीचा तिसरा पंप दोनच दिवसांत सुरू करून पाथर्डी तालुक्यातील तलाव भरणार- आ. तनपुरे

राहुरी (जनता आवाज वृत्तसेवा):-जिल्ह्यातील पाथर्डी तसेच वांबोरीकडील भागातील शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या वांबोरी चारीचा तिसरा पंप येत्या दोनच दिवसांत सुरू होऊन पाणी पाऊस कमी असलेल्या वांबोरीच्या पुढील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव, लोहगाव, भोसे, खांडगाव, कड़गाव मोहोळ आदी गावातील तलाव कोरडे असून तिसरा पंप सुरू झाल्यावर या गावांनाही पुरेशा दाबाने पाणी पोहोचून हे तलाव भरण्याचे काम ओव्हरफ्लोच्या पाण्यातून लवकरच सुरू होईल, असे आश्वासन राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाचे आ. प्राजक्त तनपुरे यांनी माहिती देताना दिले.

वांबोरी चारीच्या मुळा धरणावरील पंपींग स्टेशनवर आ. तनपुरे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामकाजाची माहिती घेतली. यावेळी आयोजित पत्रकार घेतली.

गेल्या पाच वर्षापूर्वी वांबोरी चारीला कधीही ओव्हरफ्लोच्या पाण्याचा लाभ तर मिळाला नाही. परंतु, हक्काचे असलेले पाणी ६५० एमसीएफटी पाणी सुध्दा शेवटच्या टोकापर्यंत मिळाले नव्हते. एक अभ्यासू व कार्यक्षम नेतृत्व मतदार संघाला लाभल्याने पूर्ण क्षमतेने तीसगावपर्यंत शेवटच्या टोकाचा तलाव वांबोरी चारीतून सतत ५ वर्षे भरला जात आहे. तसेच ५ वर्षात कायम ओव्हरफ्लोचे पाणी वांबोरी चारीतून दुष्काळी भागाला मिळण्याचे श्रेय केवळ आ. प्राजक्त तनपुरे यांचेच आहे. – लाभधारक शेतकरी, पाथर्डी तालुका परिषदेत आ. तनपुरे यांनी सांगितले,

तिसऱ्या पंपाची बेरिंग खराब झाल्यामुळे हा पंप नादुरुस्त होता. यासाठी गोदावरी विकास महामंडळाकडे अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू आहे. यासाठी अनेकदा अधिकाऱ्यांवर समवेत बैठका घेतल्या. त्याचप्रमाणे दूरध्वनीवरूनही वरिष्ठांशी संपर्क सतत सुरू आहेत. बेरिंगचे काम पूर्ण झाले असून थोडे सी टू व कॅपॅसिटर बँकचे काम येणाऱ्या एक दोन दिवसात पूर्ण होऊन तिसरा पंपही पूर्ण क्षमतेने चालणार आहे. त्यामुळे पाथर्डीच्या शेवटच्या गावापर्यंत तलाव भरण्याचे काम ओव्हरफ्लोच्या पाण्यातून होईल.आपल्याला कळ दाबण्यात इंटरेस्ट नसून प्रत्यक्ष तलावात पाणी कसे पोहोचेल, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. मिरी भागातीलही काही तलाव कोरडे असून त्यातही पाणी जाण्यासाठी तिसऱ्या पंपाची उपयुक्तता असून दोन पंपांपासून बऱ्याचशा भागातील तलाव पावसाने व या पाण्याने भरले असताना कोणतीही गावे वंचित राहू नयेत, यासाठी आपला पाठपुरावा सुरूच आहे. शासनाकडून पाहिजे त्या वेगात मदत मिळत नाही. तरीही ठेकेदार राजेंद्र गरड व योगेश गरड आपल्या शब्दावर कामे करून देतं असल्याबद्दल त्यांनी ठेकेदारांचेही आभार मानले. तसेच या पंप जुन्या पध्दतीचे असल्याने अनेक स्पेअर पार्ट मिळत नाहीत. लवकर उपलब्ध होत नाही. मोठ्या क्षमतेचे पंप असल्याने स्पेअर्स मिळवण्यासाठी या सर्व संकटांवर मात करून येणाऱ्या दोन दिवसांत तिसरा पंप सुरू होऊन पूर्ण गावाचे सर्व तलाव भरून घेताना या भागातील शेतकऱ्यांनाही ओव्हरफ्लोच्या पाण्याचा फायदा मिळवून देण्याचा आपला प्रयत्न कायमच राहिला आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, सुनील लवांडे, सुनील पुंड, संजय लवांडे, भोसेचे सरपंच विलास टेमकर, गंगाराम शिंदे, शिवाजी शिंदे, माणिकराव शिंदे, अशोक टेमकर, सासवडचे सरपंच राजेंद्र पाठक, सतीश पाठक, दीपक पाठक, बाळासाहेब सरोदे, मनसुख आढाव, रमेश पाठक, कौडगावचे संतोष आठरे, करंजीचे भगवान मुख्यकर, संदीप अकोलकर, अशोक पाटोळे, कडगावचे दत्तात्रय कोरडे, मांडव्याचे मधुकर लवांडे आर्दीसह पाथर्डी तालुक्यातून शेतकरी उपस्थित होते.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!