वडाळा महादेव (जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील गावठाण परिसरात महावितरण कंपनीकडून गावामध्ये केबल टाकण्याचे काम सुरू होते सदर परिसरामध्ये विविध ठिकाणी तीन डी पी असून संबंधित काम ठेकेदार यांच्या माध्यमातून सुरू होते काम सुरू असताना प्रथमता ठेकेदार यांनी एका इसमास खांबावर चढवुन काम करण्यास सांगितले.
परंतु संबंधित कर्मचारी खांबावर चढून काम करत असताना त्यास विजेचा धक्का बसून तो खाली पडला यानंतर सदर व्यक्तीस वैद्यकीय उपचारासाठी हलविण्यात आले परंतु संबंधित मनमानी करणाऱ्या ठेकेदाराने स्थानिक गावातील कर्मचारी सुनील बाळकृष्ण पवार (वय ४८) यांना खांबावर चढण्यास सांगितले यावरून येथील सुनील पवार यांनी खांबावर चढतास विजेचा जोरात धक्का बसल्याने सुनील पवार हे खांबावरून खाले पडले.
त्यावेळी त्यांना विजेचा झटका तसेच फ्लेक्स बोर्ड व खाली जोराचा मार लागला यावेळी स्थानिक ग्रामस्थ यांनी तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी पवार यांना साखर कामगार रुग्णालय या ठिकाणी हलविले परंतु प्रकृती गंभीर असल्याने वैद्यकीय सूत्रांकडून त्यांना अहमदनगर येथे उपचारासाठी हलविण्यात आले परन्तु उपचारापूर्वीच रस्त्यामध्ये पवार यांचा मृत्यू झाला यावेळी ग्रामस्थांमधून उलट सुलट चर्चा सुरू होती संबंधित ठेकेदारांनी काम करत असताना ठराविक ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित केला परंतु काही ठिकाणचा विद्युत पुरवठा सुरळीत असल्याने वीजपुरवठा याचे सर्कल निर्माण झाल्याने मयत पवार तसेच जखमी कर्मचारी यांच्यावर काळाने घाला घातला परिसरात तसेच गावात शोककळा निर्माण झाली असून सुनील पवार स्थानिक नागरिक असून ईमाने इतबारे चांगल्या पद्धतीने कामकाज हाताळत होते परन्तु संबधित ठेकेदाराच्या आडमुठे धोरणामुळे मोठी दुर्घटना घडली आहे परिसरात दुपारपासूनच वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे यावेळी महावितरणचे भोकर सब स्टेशनचे कार्यकारी अभियंता श्री गिरीश मुळे यांनी घटनास्थळी भेट दिली पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहे



