spot_img
spot_img

दृष्ट प्रवृत्तीला रोखण्यासाठीच सौ.प्रभावती घोगरे यांची उमेदवारी– आ बाळासाहेब थोरात . दहशतमुक्त वातावरण व स्वातंत्र्यासाठी सौ. घोगरे यांच्या पाठीशी उभे रहा  कोल्हार येथे सौ प्रभावती घोगरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ : सभेला मोठी उपस्थिती 

कोल्हार ( जनता आवाज वृत्तसेवा ):- शिर्डी मतदारसंघांमध्ये गेली अनेक विविध सत्ता असूनही विकास पूर्णपणे रखडला आहे. येथील दहशतीचे वातावरण संपविण्याबरोबर स्वातंत्र्य बंधुभाव व निर्मळ वातावरण निर्माण करण्यासाठी सर्वांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असून दृष्ट प्रवृत्ती रोखण्यासाठीच सौ प्रभावती  घोगरे यांची उमेदवारी असल्याचे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी जाहीर केले आहे. 

कोल्हार बुद्रुक येथे भगवती माता मंदिराच्या प्रांगणात प्रचाराचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर उमेदवार सौ प्रभावती घोगरे, करण ससाने ,सचिन कोते, रिपाईचे नेते बाळासाहेब गायकवाड, पंकज लोंढे, किरण कडू ,सचिन चौगुले, राजेंद्र अग्रवाल, संजय शिंदे, लताताई डांगे, सोमनाथ गोरे, शितल लहारे ,सुधीर म्हस्के, विजय दंडवते, राजेंद्र निर्मळ यांसह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. थोरात पुढे म्हणाले की, या मतदारसंघात खासदार, आमदार, मंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष पद अशी अनेक वर्ष सत्ता असूनही विकास कामे रखडली आहेत. गचक्यांचा रस्ता म्हणून प्रसिद्ध असलेला नगर मनमाड रस्ता यांना दुरुस्त करता आला नाही. साठ वर्षात एमआयडीसी बद्दल काहीच बोलले नाही .निवडणूक आली म्हणून एमआयडीसीच्या गप्पा सुरू झाल्या आहेत. या परिसरातील वातावरण कायमच दहशतीखाली असते. ही दहशत मोडून काढण्यासाठी महाविकास आघाडीने प्रभावती ताई घोगरे यांना उमेदवारी दिली आहे.

गणेश कारखान्याची परिस्थिती अतिशय वाईट करून ठेवली होती. परंतु सभासदांनी कारखाना आमच्या ताब्यात दिल्यानंतर अतिशय सुंदरपणे कारखाना चालवला .शेतकऱ्यांचे पेमेंट कामगारांचे पगार सर्व दिले. म्हणून गणेश परिसरात दिवाळी आनंदाची गेली .

या भागातील नेते संगमनेरला येऊन अतिशय खालच्या स्तरावर जाऊन टीका करतात. धांदरफळ मध्ये तर थेट महिलांचा अपमान करण्यापर्यंत त्यांचे धाडस झाले म्हणून गावातील महिलांनी सभा उधळून लावली .यांना पळता भुई थोडी झाली. यांचा सहवास लाभला की दृष्ट बुद्धी सुचते. आणि त्यातूनच देशमुख हा दृष्ट बुद्धीने बोलला. आणि तालुक्यात मोठा उद्रेक झाला.

गणेश, राहुरी कारखाना, सहकारी दूध संघ हे बंद पडण्याचे काम यांनी केले.संगमनेर तालुक्यात येऊन जाती-धर्माचे राजकारण करून संगमनेरची शांतता भंग करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु संगममेर तालुका अशा प्रवृत्तीला कधीही थारा देत नाही. म्हणूनच आजच्या स्थितीला तालुक्यात आठ हजार कोटीच्या ठेवी आहे. बाजारपेठ फुललेली असते. ही प्रगती या नेत्यांना पाहवत नसल्याने संगमनेरला येऊन म्हणाली की अमृतवाहिनी शाखा का काढली, मी त्यांना ठामपणे सांगतो की या भागातील लोकांना न्याय देण्यासाठीच ही शाखा काढण्यात आली आहे.

मी महसूलमंत्री असताना आमदार ससाणे यांना बरोबर घेऊन श्रीरामपूरचा खंडकरी प्रश्न मार्गी लावला .त्यामध्ये शेतकऱ्यांच्या व खंडक-याच्या हिताचेच निर्णय घेतले गेले. निळवंडे धरणाचे काम करत असताना धरणग्रस्तांसाठी प्रसंगी स्वतःची जमीन दिली .परंतु येथील नेत्यांनी कायम धरणाच्या कामात अडचणी निर्माण करण्याचे काम केले. हे महसूल मंत्री असताना सध्याचे वाळू धोरण पूर्णपणे फसले आहे. ग्रामीण भागात लोकांना घर बांधण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहे. हा प्रश्न मी अनेक वेळा विधानसभेत विचारला तर त्याला उत्तरही दिले नाही .

आता आपल्याला बदल घडवायचा आहे व महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती ताई घोगरे यांना जनतेमधून मोठा प्रतिसाद मिळत लोक दडपशाही खाली असले तरी मोठे मताधिक्य घोगरेताई यांना मिळणार आहे सर्वांनी आपसातील मतभेद विसरून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी एकजुटीने काम करा आम्ही पाठीशी आहोत असे ते म्हणाले.

सौ.प्रभावती घोगरे म्हणाल्या की, माझे वडील राजकारणात असल्यामुळे मला राजकारणाचा वारसा आहे .शिर्डी मतदारसंघाची दहशत संपवण्यासाठी मी शपथ घेतली आहे .मला उमेदवारी मिळू नये म्हणून अनेक प्रयत्न केले गेले परंतु आ. बाळासाहेब थोरात हे माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याने मला उमेदवारी मिळाली .शिर्डी मतदारसंघांमध्ये अनेक विकास कामे प्रलंबित आहे ते पूर्ण करण्यासाठी माझी उमेदवारी आहे. गेली 35 वर्ष तुम्ही जे केले नाही ते मी पाच वर्षात करणार आहे आणि शिर्डी मतदार संघाला भयमुक्त करण्याचा संकल्प मी केला आहे.

याप्रसंगी बाळासाहेब गायकवाड, करण ससाने , सुरेंद्र खर्डे, सचिन चौगुले,आदींसह विविध नेत्यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी कोल्हार व परिसरातील नागरिक युवक महिला व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मत विभाजन टाळा

राजेंद्र पिपाडा हे सत्ताधारी विखे यांच्या विरोधात अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी करतात. परंतु सत्ताधाऱ्यांची दहशत मोडण्यासाठी सर्वांनी मतविभाजन न करता सौ घोगरेताई यांच्या पाठीशी उभे रहा. अत्यंत अंतकरणापासून तळमळीने आणि उत्स्फूर्तपणे त्या आपली मांडणी करत असतात . काही लोक संगमनेरमधील अंभोरेमध्ये येऊन रडले. इतरांसारखा नाटकीपणा त्यांनी कधीही केला नाही. असे सांगताना राहत्याचा आवाज विधान भवनात पोहोचवा असे आवाहन केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!