करंजी( जनता आवाज वृत्तसेवा ):- करंजी येथे आज भाजपचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांचा प्रचाराचा शुभारंभ त्यांच्या सुनबाई प्रियंका अक्षय कर्डिले व शिवाजीराव कर्डिले यांच्या पत्नी अलकाताई शिवाजीराव कर्डिले यांनी सुरू केला उत्तरेश्वर महादेव मंदिरात नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी मोठ्या संख्येने महीला उपस्थित होत्या. करंजी ,कानोबवाडी, सातवड, त्रिभुवनवाडी , कवडगाव, देवराई , घाटशिरस , तिसगाव, निंबोडी आदि ठिकाणी मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचार सुरू केला.
यावेळी बोलताना अलका कर्डीले म्हणाल्या की गेल्या ३० वर्षांमध्ये राजकारण करत असताना आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी आपल्याकडे येणारा माणूस आपलाच समजून त्याचं काम केलं. गरीब श्रीमंत , हा आपला तो विरोधी असा भेदभाव न पाहता कोणतही राजकारण न करता त्याचं काम केलं आहे त्यामुळे जनतेच्या मनात आजही आ. शिवाजी कर्डीले आहेत
राज्यातील महायुती सरकारने लाडकी बहीण योजना , युवकांना स्वयंरोजगार, पिक विमा, कांद्याला भाव ,दुधाला भाव तसेच अतीरिक्त अनुदान अशा राज्य सरकारने अनेक योजना आणले आहेत. त्यामुळे या सर्व योजनांचा आम जनतेला मोठा फायदा झाला असून यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणी कर्डिलेच्या पाठीशी उभा राहिल्याचे दिसून येत आहे.आणि म्हणूनच या भागातून मोठे मताधिक्य कर्डिले यांना मिळणार असल्याचे प्रियंका कर्डीले यावेळी सांगितले.



