spot_img
spot_img

नेवासा वकील संघाच्यावतीने आ. विठ्ठलराव लंघे – पाटील यांचा जाहिर सत्कार! नेवासा वकील संघाच्या पाठीशी भविष्यात ठामपणे उभा राहणार – आ. विठ्ठलराव लंघे – पाटील यांचे आश्वासन

नेवासा (जनता आवाज वृत्तसेवा): – जिल्हा न्यायालयाच्या नुतन इमारतीसाठी ५१ कोटी २३ लाख रुपये खर्चास आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी नुकतीच प्रशासकिय मान्यता मिळवून दिल्यामुळे नेवासा वकील संघाच्यावतीने आ. विठ्ठलराव लंघे – पाटील यांचा शनिवार (दि.१) रोजी नेवासा न्यायालयाच्या वकील कार्यालयात सत्कार करण्यात आला तर आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी वकील संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.

यावेळी व्यासपीठावर आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील,नेवासा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.गणेश निकम, ॲड .अजय रिंधे,उपाध्यक्ष सुदाम ठुबे,माजी अध्यक्ष ॲड .कल्याण पिसाळ, ॲड .अशोकराव करकड, जेष्ठ विधिज्ञ ॲड .देसाई आबासाहेब देशमुख, ॲड.बी.एस.काळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील म्हणाले की,नेवासा न्यायालयाच्या या जुन्या इमारतीमध्ये ज्ञानदान करण्यासाठी न्यायमुर्ती,वकील व पक्षकारांसाठी असलेली ही इमारत अत्यंत कमी पडत होती या इमारतीमध्ये सध्या जिल्हा न्यायाधीश,दोन वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश तसेच चार कनिष्ठस्तर दिवाणी न्यायाधिश असे या इमारतीमध्ये कामकाज करीत असतांना ही इमारत आता न्यायालयीन कामासाठी अपुरी पडत होती त्यामुळे येथे काम करण्यासाठी पक्षकार व वकिलांची तसेच न्यायालयाची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्यामुळे आपण वकील संघाने केलेल्या पाठपुराव्यामुळे या नविन इमारतीसाठी ५१ कोटी २३ लाख रुपये खर्चास प्रशासकिय मान्यता मिळवून दिलेली असून भविष्यात या इमारतीमध्ये ज्ञानदान करण्यासाठी मोठी जागा आणि इमारत उभी राहणार असल्याचे यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी यावेळी बोलतांना स्पष्ट केले.

नेवासा वकील संघाचे पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे आपण नवी इमारत कामास प्रशासकीय मान्यता मिळवून दिलेली असून भविष्यातही आपण वकील संघाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू असे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले यावेळी आमदार लंघे – पाटील यांचा वकील संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला तर आमदार लंघे यांनी वकील संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला यावेळी मोठ्या संख्येने वकील बांधव यावेळी उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!