कोल्हार( जनता आवाज वृत्तसेवा) :- अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर (दिंडोरी प्रणित) सेवा मार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने बालसंस्कार व युवा प्रबोधन विभाग आयोजित ‘युवा महोत्सव’ आज, दिनांक २ मार्च २०२५ रोजी सकाळी ठीक ९ वाजता आईसाहेब लॉन्स, लोणी-संगमनेर रोड, चंद्रापूर, ता. राहाता येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांनी दिली.
नितीन मोरे हे युवकांना करिअर, व्यक्तिमत्त्व विकास, अध्यात्म, गडकिल्ले संवर्धन, पर्यावरण, व्यसनाधीनता, वृद्धाश्रम मुक्त भारत, देश-विदेश अभियान यासह अनेक विविध विषयांवर मार्गदर्शन करत युवा वर्गाच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अविरतपणे कार्य करीत असून तरुणाईच्या सर्वांगीण प्रगती आणि कौशल्यविकासासाठी सातत्याने प्रबोधनपर हितगुजातून करीत असतात.
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘युवा महोत्सव’ संपन्न होत आहे. ‘राष्ट्रनिर्मितीसाठी युवा सक्षमीकरण’ या विषयावर अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाचे प्रमुख नितीन मोरे यांचे मार्गदर्शन होणार आहे. कौशल्य विकास उपक्रमांचे तज्ज्ञ अधिकारी यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी रक्तदान शिबिर, युवक-युवती मार्गदर्शन स्टॉल व प्रशिक्षणाचेही आयोजन करण्यात आले असून, वरील सर्व उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांनी यांनी केले आहे.
नितीन मोरे यांचे मार्गदर्शन लाभणार
युवा प्रबोधन विभाग हा प्रामुख्याने युवा वर्गाच्या सर्वागीण विकासासाठी कार्यरत आहे. लोणी येथे आयोजित केलेल्या युवा महोत्सवात विविध विषयतज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार असून युवा वर्गाचे प्रेरणास्रोत नितीन मोरे यांची प्रमुख उपस्थितीत अमृततुल्य मार्गदर्शन लाभणार आहे.
स्पर्धा परीक्षा-नोकरीबाबत मार्गदर्शन
सकाळी ठीक ९ वा. युवतींसाठी डॉ. शलाका शिंदे यांचे ‘आहार-आरोग्य समुपदेशन सत्र’, त्यानंतर निवृत्त सहाय्यक आयुक्त, केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे सुहास पाटील यांचे ‘स्पर्धा परीक्षा-नोकरी संधी व करिअर मार्गदर्शन’ आयोजित करण्यात आलेले आहे.



