19.5 C
New York
Wednesday, June 18, 2025

Buy now

spot_img
spot_img

ममदापूर येथे कत्तलसाठी ठेवलेल्या 21 गोवंश जनावराची सुटका   9,35,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त 

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा):- याबाबत अधिक माहिती अशी की,.राकेश ओला, पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांनी पोनि.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना जिल्हयातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. 

सदर माहिती अशी की,नमुद आदेशान्वये पोनि.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, गणेश भिंगारदे, गणेश लोंढे, सोमनाथ झांबरे, बाळासाहेब नागरगोजे, अमोल कोतकर, मनोज लातुरकर, बाळसाहेब गुंजाळ, भगवान थोरात, सुनिल मालणकर, भाऊसाहेब काळे, अमृत आढाव, विशाल तनपुरे, प्रमोद जाधव, रणजीत जाधव, रमीजराजा आत्तार, शिवाजी ढाकणे व उमाकांत गावडे अशांचे पथक तयार करुन कारवाई करणेबाबत आदेशीत केले.

दि. ११  रोजी पथकास गोपनीय माहिती मिळाली की, ममदापूर ता.राहाता येथे इसमनामे शोएब कुरेशी व त्याचे साथीदार अशांनी मिळून गोवंशीय जनावरे कत्तल करण्याकरीता निर्दयतेने,विना चारा पाण्याचे एका घरामध्ये डांबुन ठेवून त्यांची स्वीफ्ट व इंडीगो कारमधुन वाहतुक करत आहे.तपास पथकाने मिळालेल्या माहितीवरून पंचासमक्ष जाऊन खात्री केली असता एका घरासमोर इंडीगो व स्वीफ्ट कार दिसल्याने पथकाने छापा टाकुन कारवाई करत असताना स्वीफ्टमधील एक इसम पळून गेला.घटना ठिकाणावरून इंडीगो कारमधील  साजीद युनूस कुरेशी, वय 26,( रा.ममदापूर, ता.राहाता, जि.अहिल्यानगर)  रेहान अहमद अयाज कुरेशी, (वय 24, रा.ममदापूर, ता.राहाता, जि.अहिल्यानगर) अशांना ताब्यात घेतले. ताब्यातील आरोपीकडे स्वीफ्ट मधील पळून गेलेल्या इसमाचे नाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव  शोएब यासिन कुरेशी, (रा.ममदापूर, ता.राहाता, जि.अहिल्यानगर (फरार ) असे असल्याचे सांगीतले.तसेच ताब्यातील आरोपीकडे जनावरांचे मालकीबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदरची जनावरे ही शोएब यासिन कुरेशी, शाहीद उस्मान कुरेशी (फरार) 5) मुद्दसर गुलाम कुरेशी (फरार) अ.क्र.4 व 5 रा.ममदापूर, ता.राहाता, जि.अहिल्यानगर यांची असल्याचे सांगीतले.

तरी ताब्यातील आरोपीकडील वाहनाची तपासणी केली असता इंडीगो व स्वीफ्ट गाडीमध्ये गोवंश जातीचे वासरे तोंड प्लास्टीक चिकट टेपने बांधले असल्याचे दिसून आले.तसेच घटनाठिकाणी एका अर्धवट काम झालेल्या घरामध्ये गोवंश जातीची जिवंत वासरे विना चारा पाण्याचे चिकट टेपने तोंड बांधुन ठेवलेली मिळून आली. पथकाने पंचासमक्ष घटनाठिकाणावरून 9,35,000/- रू किं.त्यात 21 गोवंश जातीचे वासरे, एक इंडीगो कार क्रमांक एमएच-15-डीसी-8199, एक स्वीफ्ट कार क्रमांक एमएच-02-एपी-2921 व दोन मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ताब्यातील आरोपीस जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह लोणी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले.वर नमूद आरोपीविरूध्द लोणी पोलीस स्टेशन गुरनं 301/2025 महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा कलम 5 (अ), 5 (ब), 9 सह प्राण्यांना निदर्यतेने वागविण्याचे कलम 3, 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा.श्री.वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधिक्षक,श्रीरामपूर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!