मुंबई (जनता आवाज वृत्तसेवा) :- पत्रकारांना मिळणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर आज डोंगरी पोलीस ठाण्यात जर्नलिस्ट असोसिएशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा अँड. स्मिता चिपळूणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट दिली.
या प्रकरणात संबंधित गुन्हेगारांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यामध्ये जर्नलिस्ट ॲक्ट अंतर्गतही कलमे लावण्यात आली आहेत.
याबाबत योग्य आणि तत्पर कारवाई केल्याबद्दल जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीने डोंगरी पोलिसांचे आभार मानण्यात आले. तसेच, पत्रकारांच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारची कारवाई पुढेही सुरू ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली




Total Users : 632393