spot_img
spot_img

भारतातून यंदा १ लाख ७० हजार हाजी साहेब मक्का मदिना येथे जाणार ४४ विमानातून १३ हजार हाजी मदीन्यात दाखल ; संपूर्ण शाही व्यवस्था

बेलापूर (जनता आवाज वृत्तसेवा):-अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या हज यात्रेस मोठया दिमाखात, शानदार प्रारंभ झाला आहे. आत्तापर्यंत भारतातून ४४ विमानांमधून सुमारे १२ हजार २१८ हाजी साहेब यात्रेसाठी मदिना येथे रवाना झाले आहेत.

भारतीय हज कमिटी कडून १ लाख २२ हजार ५१८ तर हज ग्रुप ऑर्गनायझेशन (टूर्स) च्या माध्यमातून ४७ हजार ५०७ हाजी साहेब मक्का मदीना येथे यंदा हज यात्रेसाठी जाणार आहेत.

हज कमिटी कडून जाणाऱ्या हाजीसाहेबांची राहण्याची व्यवस्था अजिजिया येथे करण्यात आली आहे.

तर हज ग्रुप ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून जाणाऱ्या हाजीसाहेबांची व्यवस्था प्रारंभिक मदिना येथे आणि नंतर मक्का येथे करण्यात आली आहे.

गेल्या ४ दिवसापूर्वी भारतातून गेलेल्या बारा हजाराहून अधिक हाजीसाहेबांची रवानगी मदिना येथे झाली आहे.

या सर्व हज यात्रे करूनचे कौन्सिल जनरल अहमद खान यांच्या हस्ते गुलाबपुष्प देत स्वागत करण्यात आले.

अजिजिया येथे राहणाऱ्या सर्व हज यात्रे करुंसाठी मक्का येथे जाण्यासाठी दिवस आणि रात्र वातानुकूलित बसेसची मोफत आणि मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आली आहे.

३० एप्रिल नंतर भारतातील काही हज यात्रे करूनची जेद्दा येथून मक्का आणि मदिना येथे जाण्यासाठी सोय करण्यात आली आहे.

संपूर्ण देशभरातील हज यात्रे करू साठी मक्का मदिना येथे वेगवेगळ्या एरियात हज कार्यालयांबरोबरच विभागीय कार्यालय तसेच हॉस्पिटलची २४ तास सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सद्यस्थितीत मक्का आणि मदिना येथील तापमान कमाल आणि किमान १९ ते ३४ अंश सेल्सिअस अशा प्रमाणात नोंदविण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!