spot_img
spot_img

‘राम कृष्ण हरी’ फेम रीलस्टार शुभम पवार जनगणनेचे ‘ब्रँड ॲम्बेसेडर’

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा) : – सोशल मीडियावर ‘राम कृष्ण हरी’ या खास टॅगलाईनमुळे घराघरात पोहोचलेले रीलस्टार शुभम पवार आता जनगणना २०२६ आणि शासकीय योजनांच्या जनजागृतीचे ‘ब्रँड ॲम्बेसेडर’ बनले आहेत. टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक असलेल्या शुभम पवार यांनी ग्रामीण भाषेतील सहज, उपदेशात्मक आणि मनोरंजक रील्समधून तीन लाखांहून अधिक फॉलोअर्सची मने जिंकली आहेत. त्यांच्या लोकप्रियतेचा प्रभावी वापर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

श्रीरामपूरचे प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांच्या संकल्पनेतून आणि तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शुभम पवार यांना अधिकृत नियुक्तीपत्र देत मोहिमेचे ‘सारथी’ म्हणून जबाबदारी दिली. जनगणना, निवडणूक प्रक्रिया, मतदार नोंदणी तसेच विविध कल्याणकारी योजनांची माहिती आता शुभम पवार यांच्या डिजिटल शैलीतील रील्सद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.

यावेळी नायब तहसीलदार दत्तात्रय शेकटकर, सहाय्यक महसूल अधिकारी निलेश इंगळे, तलाठी राजेश घोरपडे, संदीप पाळंदे, राजेश कवाने आणि महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!