spot_img
spot_img

जबरी चोरी करणारे सराईत आरोपीची टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद

अहिल्यानगर(जनता आवाज वृत्तसेवा):- अहिल्यानगर जिल्ह्यात जबरी चोरी करणारे सराईत आरोपीची टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद, आरोपींकडुन 10 गुन्हे उघडकीस आणुन, ११, १९, ८००/- रुपये किमतीचा मुद्देमालासह जप्त केले आहे.

अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. 317/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309(6) प्रमाणे दि. 21 रोजी गुन्हा दाखल असुन सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी सौ ताराबाई मुरलीधर कोकाटे हे शेतामध्ये काम करत असतांना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे गळ्यातील 78,000/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने बळजबरीने चोरुन नेलेले आहेत.

सदर गुन्हा उघडकीस आणणेकरीता स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि श्री किरणकुमार कबाडी यांचे नेतृत्वाखाली सपोनि/ हरिष भोये, महादेव गुट्टे पोलीस अंमलदार गणेश लोंढे, फुरकान शेख, श्यामसुंदर जाधव, बाळासाहेब खेडकर, भाऊसाहेब काळे, किशोर शिरसाठ, मनोज साखरे, सुनिल मालणकर, आकाश काळे, बाळासाहेब गुंजाळ, योगेश कर्डीले, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे, किरण ठुबे, चालक भगवान धुळे, अरुण मोरे यांचे पथक तयार करुन सदर पथकास गुन्हा उघडकीस आणणेकामी सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना करण्यात आले होते.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पथकाने सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीने घटनाठिकाणी भेट देवुन घटनाठिकाणची पाहणी केली. सदर गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असतांना व्यवसायीक कौशल्याचे आधारे सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी नामे गणेश दिवानजी काळे रा. वाकोडी ता.जि. अहिल्यानगर याने त्याचे साथीदारासह केला असुन तो त्याचे साथीदारासह ü अहिल्यानगर सोलापुर जाणारे रोडवर वाकोडी गावचे शिवारात जुना जकात नाका येथे दोन मोटार सायकलवर आले असल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर पथकाने मिळालेल्या माहितीचे आधारे सदर ठिकाणी जावुन खात्री करता जुना जकात नाका येथे दोन मोटार सायकल जवळ तीन इसम उभे असल्याचे दिसुन आले. पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी जात असतांना ते तेथुन पळुन जावु लागले त्यावेळी पथकाने त्यांचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नांव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नांवे 1) गणेश दिवानजी काळे वय-28 वर्षे रा.वाकोडी ता.जि. अहिल्यानगर, 2) विनय उर्फ टकल्या योगेश काळे वय-19 वर्षे रा. वाळुंज ता.जि. अहिल्यानगर, 3) रोहित लल्या भोसले वय-23 वर्षे रा. सराटी वडगांव ता.आष्टी जि. बीड असे असल्याचे सांगितले. ताब्यातील इसम नामे गणेस दिवानजी काळे याचेकडे गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईने विचारपुस करता त्याने त्याचे आणखी दोन साथीदासह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. पथकाने गुन्ह्यामध्ये चोरी केलेले दागिने आरोपीचे कब्जातुन व आरोपीचे राहते घरातुन 9,04,800/- रु कि.चे 102 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे, 45,000/-रु कि.चे तीन मोबाईल, 1,70,000/- रु कि.चे दोन मोटार सायकल असा एकुण 11,19,800/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.Maps

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!