spot_img
spot_img

आ.विवेक कोल्हे यांच्यासह नवनियुक्त आमदार यांचा उद्या होणार शपथविधी 

कोपरगाव (जनता आवाज वृत्तसेवा):- भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विवेक कोल्हे यांचा महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्य म्हणून शपथविधी १४ मे रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील विधान भवन येथे होणार आहे. भाजपाने सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत उमेदवारी दिली होती. त्यांच्या निवडीमुळे कोपरगावसह उत्तर महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

युवकांचे प्रश्न, शेती, रोजगार आणि ग्रामीण विकासाचे मुद्दे विधान परिषदेत प्रभावीपणे मांडले जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या सोहळ्यासाठी कोपरगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यातून समर्थक मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना होणार असून, युवा नेतृत्वाला मिळालेली ही संधी राज्याच्या राजकारणात महत्त्वाची मानली जात आहे.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!