spot_img
spot_img

पत्नीच्या वाढदिवसानिमित्त भानुदास कोतकर यांनी दिली हेलिकॉप्टरची भेट

अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा):- नगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भानुदास कोतकर यांनी आपल्या पत्नी, जिल्हा बँकेच्या संचालिका सुरेखा कोतकर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हेलिकॉप्टर भेट म्हणून दिले. यामुळे कोतकर कुटुंबाच्या वाहन ताफ्यात अजून एक  हेलिकॉप्टरची भर पडली आहे.

आज केडगाव येथे या हेलिकॉप्टरसाठी खास हेलिपॅड तयार करण्यात आले होते. हेलिकॉप्टर केडगावात दाखल होताच कोतकर दाम्पत्याने त्याची विधिवत पूजा केली.

पूजेनंतर या हेलिकॉप्टरने हवेत भरारी घेऊन केडगावच्या रेणुका माता मंदिर, शहराचे आराध्य दैवत श्री विशाल गणपती मंदिर व माळीवाड्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

नगर, पुणे, मुंबई येथे हॉटेल व्यवसायात नावलौकिक असलेल्या कोतकर कुटुंबाचे स्वतःचे खासगी हेलिकॉप्टर खरेदी करण्याचे अनेक वर्षांचे स्वप्न होते. ते आज पूर्ण झाले, अशी भावना उद्योजक सचिन कोतकर यांनी व्यक्त केली. लवकरच खासगी हेलिकॉप्टर कंपनी स्थापन करून अलिशान हेलिपॅड उभारले जाणार आहे.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!