बालाजी देडगाव ( जनता आवाज वृत्तसेवा ):- नेवासा तालुक्यातील पाचुंदा परिसरात अत्यंत दुर्दैवी हृदयद्रावक घटना घडली असून सख्या भाऊ-बहिणीचा शेत तळ्यात बुडून मृत्यू झाल्याने गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोघेही तळ्याजवळ पेरू खाण्यासाठी गेले असता अचानक स्वाती रामदास खरात वय १६ वर्षे ही तळ्यात घसरली व तिला वाचवण्यासाठी भाऊ किरण रामदास खरात वय १५ वर्षे याने उडी मारली परंतु दोघांना पोहता येत नसल्याने दोघांचा दुर्दैवी अंत झाला .पाण्यात पडल्याने ही दुर्घटना घडली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले, मात्र दोघांनाही वाचविण्यात अपयश आले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली.
या हृदयद्रावक घटनेमुळे खरात परिवारासह पाचुंदा गावासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आई वडील अतिशय गरीब कुटुंबातील असून ड्रायव्हर काम करत आहे.तर चंद्रकांत गणपत खरात यांचे नात व नातू होते. ही दोघे त्रिमूर्ती संकूल तेलकुडगाव येथे शिक्षण घेत होते.



