संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):- राज्यामध्ये उच्च व तांत्रिक शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्थांमध्ये अग्रमानांकित असलेल्या अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2026 च्या अंतिम परीक्षेत सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांनी मोठे यश मिळवले असून 83 विद्यार्थ्यांना विविध विषयात शंभर पैकी 100 गुण मिळवले असून यावर्षीही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली असल्याची माहिती प्राचार्य प्रा. व्ही.बी धुमाळ यांनी दिली आहे.
एमएसबीटीई परीक्षा 2026 मध्ये अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अमृतवाहिनी तंत्रनिकेतन मधील विविध विभागांच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केले आहे. याचबरोबर 83 विद्यार्थ्यांनी विविध विषयांमध्ये शंभर पैकी 100 गुण मिळवले आहेत. उत्कृष्ट गुणवत्ता व उ निकाल याचबरोबर अमृतवाहिनी संस्थेचा विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबर सामंजस्य करार आहे यामुळे विविध कंपनी महाविद्यालयात येऊन विद्यार्थ्यांच्या कॅम्पस इंटरव्यू घेत असतात यावर्षी 624 विद्यार्थ्यांना चांगल्या पॅकेजवर थेट नोकरीच्या संधी मिळाली आहेत. सातत्याने विविध कंपन्यांमधून होत असलेल्या प्लेसमेंट मुळे विद्यार्थ्यांना करिअर साठी ही मोठी संधी आहे.
यावर्षीच्या निकालात
स्थापत्य अभियांत्रिकी विभाग ( Civil Engineering )
द्वितीय वर्ष टॉपर विद्यार्थी
1. निखिल दत्तात्रय भरितकर – 90.80%,
2. दिव्या प्रफुल्ल कडलग – 88.80%,
3. सिद्धी सोमनाथ देशमुख – 87.71%,
4. रोहित बालू बरगळ – 87.09%,
5. आदित्य विरेंद्र परदेशी – 86.17%,
तृतीय वर्ष टॉपर विद्यार्थी
1. कृष्णराज सुरेश मंडलिक – 95.28%,
2. सर्वेश संजय गायकवाड – 92.61%,
3. अर्जुन अजित गुंजाळ – 91.78%,
4. वैभव प्रकाश पवार – 89.94%,
5. तन्वी अनिल कांदळकर – 88.67%,
कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी विभाग ( Computer Technology )
द्वितीय वर्ष टॉपर विद्यार्थी
1. यशराज राजेश गोडसे – 94.41% , 2. पूजा किरण अंबारे – 93.82% , 3. ईशान जयंत मनसुके – 93.76% , 4. साधिचा दत्तू हसे – 93.71%, 5. जोया वकार शेख – 93.35%,
तृतीय वर्ष टॉपर विद्यार्थी 1. प्रसाद बाबासाहेब गोसावी – 97.06%, 2. कृष्णा गोविंद दहिफळे – 96.71% , 3. अनुजा संतोष कडलग – 96.35% , 4. सपना नारायण साबळे – 96.18% , 5. सिद्धेश रविंद्र भामरे – 95.71% ,
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभाग ( E&TC )
द्वितीय वर्ष टॉपर विद्यार्थी
1. ऋतुजा रामनाथ खतोडे – 91.17% , 2. धनश्री संदीप फुलसुंदर – 89.00% , 3. स्वामिनी सुधाकर शेजुळ – 87.56% , 4. अनुष्का तुषार अत्तरदे – 85.72%, 5. समीक्षा कैलास कासार – 85.50% ,
तृतीय वर्ष टॉपर विद्यार्थी ,
1. सुयश भाऊसाहेब बोम्बले – 95.60% , 2. श्रुष्टी अरुण कोटकर – 93.71% , 3. अनुष्का मच्छिंद्र खैरे – 93.37% , 4. मयुरी अनिल कानवडे – 93.20% , 5. ओम योगेश कडलग – 92.06% ,
माहिती तंत्रज्ञान विभाग ( Information Technology )
द्वितीय वर्ष टॉपर विद्यार्थी
1. तनुजा विठ्ठल आढाव – 95.71% , 2. शिफापरवीन असगरअली अन्सारी – 95.35% , 3. आदित्य किरण कापले – 94.76% , 4. अमेय सुरेश कासार – 94.59% , 5. प्रेम रविंद्र गुंजाळ – 94.06% ,
तृतीय वर्ष टॉपर विद्यार्थी
1. गायत्री सोमनाथ भागवत – 92.00% , 2. वैष्णवी भाऊसाहेब सातपुते – 91.29% , 3. गुंजन महेश देशमुख – 89.82% , 4. सुप्रिया बाबासाहेब पवार – 89.35% , 5. वैभवी रामदास धनवडे – 88.88% ,
मेकॅनिकल अभियांत्रिकी विभाग ( Mechanical Engineering )
द्वितीय वर्ष टॉपर विद्यार्थी 1. रुशी भीमाशंकर दुबे – 89.83% . 2. अक्षदा दत्तात्रय रेवगडे – 85.05% , 3. साहिल नंदू बोडके – 84.61% , 4. पूजा सुभाष चंद्रे – 84.44% , 5. रोहन मधुकर म्हसे – 83.77% ,
तृतीय वर्ष टॉपर विद्यार्थी
1. ओम लक्ष्मण काकड – 90.89% , 2. अभिजीत सोन्याबापू इनोर – 89.56% , 3. सृष्टी हरीश देशमुख – 89.11% , 4. निलम रविंद्र गुंजाळ – 88.78% , 5. वरद विजयकुमार जाधव – 87.22% ,
मेकॅट्रॉनिक्स विभाग (Mechatronics Engineering)
द्वितीय वर्ष टॉपर विद्यार्थी
1. साक्षी संभाजी कुटे – 90.39% , 2. प्रद्युम्न बाबासाहेब गायकवाड – 90.39% , 3. अस्मिता योगेश खांडगे – 90.11% , 4. योगेश संजय गुळवे – 86.89% , 5. नम्रता नवनाथ इलग – 86.44% , 6. विद्या नामदेव वाघ – 86.28% ,
तृतीय वर्ष टॉपर विद्यार्थी
1. राऊत रोहन दीपक – 91.17% , 2. काळे अजिंक्य लक्ष्मण – 90.72% , 3. शेख जुनेरा अनिस – 89.56% , 4. वाकचौरे चैतन्य मनोज – 89.11% , 5. यादव यश राजेश – 87.89%
या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. याचबरोबर एकूण 83 विद्यार्थ्यांना विविध विषयांमध्ये 100 पैकी 100 गुण मिळाले आहेत.
उत्कृष्ट निकाल व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाराष्ट्राचे माजी महसूल व शिक्षणमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, मा. आ. डॉ. सुधीर तांबे, संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, अकॅडमी डायरेक्टर डॉ जे बी गुरव ,प्राचार्य प्रा. व्ही.बी. धुमाळ, उपप्राचार्य प्रा. जी.बी काळे , सर्व विभाग प्रमुख व शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त व गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या बळावर हे यश संपादन केले असून भविष्यातही अशीच उल्लेखनीय कामगिरी करतील असा विश्वास प्राचार्य प्रा. व्हि.बी धुमाळ यांनी व्यक्त केला आहे.



