संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):-पुणे–नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प रद्द करण्याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री यांनी केलेल्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमी आमदार अमोल खताळ यांनी मुंबई येथील रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीत मांडत हा रेल्वे मार्ग सरळ मार्गानेच व्हावा अशी ठाम भूमिका या बैठकीत मांडली त्यानंतर अहिल्यानगर नाशिक पुणे या तीन जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करण्याचे या बैठकीत ठरले असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले
मुंबई येथील रेल्वे अधिकाऱ्यांच्या समवेत राज्याचे जलसंपदा मंत्री आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अहिल्या नगर पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला तीनही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते
या बैठकीत आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर तालुक्या तील जनतेच्या भावना रेल्वे अधिकाऱ्यां समोर ठामपणे मांडत, पुणे–नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प कोणत्या ही परिस्थितीत सरळ मार्गानेच झाला पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका घेतली. हा रेल्वे प्रकल्प उत्तर महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या प्रकल्पामुळे नाशिक, सिन्नर, संगमनेर, अकोले, जुन्नर, आंबेगाव तसेच परिसरातील उद्योग, व्यापार, पर्यटन व रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प मूळ सरळ मार्गानेच पूर्ण करणे ही काळाची गरज असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले . या मुख्य बैठकीसाठी पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधींची मते ऐकून घेण्यात आल्या .
“संगमनेर तालुक्याच्या विकासाचा हा लढा शेवटपर्यंत लढला जाईल. आपल्या हक्काची रेल्वे मिळवण्या साठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत असून, सरळ मार्गावरील जनतेच्या न्याय्य मागणीसाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला जाईल.”
अमोल खताळ (आमदार संगमनेर विधानसभा)



