हणमंतगाव( जनता आवाज वृत्तसेवा):- राहाता तालुक्यातील हणमंतगावं येथे भर दुपारी अद्विक घोलप वय साडेतीन वर्ष हा बिबट्याच्या तावडीतून बालंबाल बसवण्यात यश मिळाले आहे.
हणमंतगावं येथे गेल्या चार दिवसापासून बिबट्याने एका शेतकऱ्यावर हल्ला करून दुसऱ्या दिवशी त्याच भागात पुन्हा एका शेतकऱ्याच्या मागे लागला व आता दोन दिवसापासून बिबट्या अजिंक्य विलास घोलप यांच्या वस्तीवर येऊन कोंबड्यांचा फडशा पडला आणि आज दुपारी एक वाजता पुन्हा बिबट्या वस्तीवर आला व कोंबडीवर हल्ला केला परंतु कोंबडी त्याच्या तावडीत सापडली नाही. जवळच पंधरा वीस फुटावर खेळत असलेल्या अद्विक अजिंक्य घोलप या साडेतीन वर्ष वयाच्या मुलाकडे पाहत पाहत होता योगायोगाने शेजारील वस्तीवरील साक्षी सुनिल घोलप मुलीचे लक्ष गेले आणि धावत जाऊन अद्विक ला उचलून गोठ्यात पळाली. साक्षी सुनिल घोलप ही मुलगी नसती तर अनर्थ घडला असता.
त्यांनी ताबडतोब मानद वन्यजीव रक्षक विकास म्हस्के यांना माहिती दिली व ते तातडीने घटनास्थळी जाऊन नदीजवळील पिंजरा घोलप यांच्या वस्तीवर लावला.
वनविभागाने या परिसरात तीन पिंजरे लावले असून संध्याकाळी थर्मल ड्रोन ने बिबट्याच्या हालचाली वर लक्ष ठेवून आहे. परंतु बिबट्या पिंजऱ्यात अडकायला तयार नाही.




Total Users : 624769