spot_img
spot_img

लोहारे-कासारे पाझर तलावातून सिंचनासाठी व पिण्यासाठी पाणी सोडले शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आ. खताळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना 

संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):- संगमनेर तालुक्यातील लोहारे-कासारे येथील पाझर तलावातील पाणी खरीप हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी तसेच परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्यात आले आहे. आमदार अमोल खताळ यांनी लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देत पाणी सोडण्याची कार्यवाही करून घेतल्याने परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाणी सोडण्यात आल्याबद्दल शेतकऱ्यांनी आमदार खताळ यांचे आभार मानले.

खरीप हंगामातील पिकांना सध्या पाण्याची गरज असून, परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला असल्याने लोहारे -कासारे परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे पाझर तलावातील पाणी सोडण्याची मागणी केली होती. या शेतकऱ्यांच्या मागणीची आमदार खताळ यांनी तातडीने दखल घेत. लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना पाझर तलावातील पाणी तातडीने सोडण्या बाबतच्या सूचना दिल्या.त्यानुसार तलावातील पाणी सोडण्यात आले. त्यामुळे खरीप पिकांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार असून, परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गरजही भागण्यास हातभार लागणार आहे.

पाझर तलावाचे पाणी सोडण्यात आल्याने लोहारे-कासारे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांच्या मागणीची तातडीने दखल घेऊन प्रशासनाकडे पाठपुरावा केल्याबद्दल शेतकऱ्यांनी आमदार अमोल खताळ यांचे आभार मानले.

शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात केवळ आश्वासन न देता प्रशासनाकडे पाठपुरावा करून प्रत्यक्ष निर्णयाची अंमलबजावणी होणे महत्त्वाचे असते. लोहारे- कासारे येथील शेतकऱ्यांची पाण्याची गरज लक्षात घेऊन तातडीने पाझर तलावातून पाणी सोडण्यात आल्याने खरीप पिकांना मोठा आधार मिळाला असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!