spot_img
spot_img

खरवंडी येथे भंडाऱ्यातील आमटी खाल्ल्याने आठ जणांना विषबाधा आ. विठ्ठलराव लंघे पा. यांनी रुग्णालयात भेट देऊन रुग्णांची केली विचारपूस

खरवंडी( जनता आवाज वृत्तसेवा):-  नेवासा तालुक्यातील खरवंडी येथे भंडाऱ्यातील आमटी खाल्ल्याने आठ जणांना विषबाधा झाली. फाटके कुटुंबातील चार जण, भोगे कुटुंबातील एक महिला तसेच इतर तीन नागरिकांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

यातील काही रुग्णांवर खरवंडी येथील स्थानिक दवाखान्यात, तर गंभीर रुग्णांवर अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती मिळताच आमदार  विठ्ठलराव लंघे पाटील यांनी रुग्णालयात भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. तसेच डॉक्टरांशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे सर्व रुग्णांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!