spot_img
spot_img

वृक्षघोटाळ्याचे सत्य कधी उघडणार?

नेवासा तालुका (जनता आवाज वृत्तसेवा):-   नेवाशातील बहुचर्चित वृक्षघोटाळा प्रकरणाचे पुढे काय झाले, असा सवाल आता नेवासकरांमधून उपस्थित केला जात आहे. या प्रकरणासंदर्भात विविध संघटना तसेच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून तक्रारी करण्यात आल्याचे सांगितले जात असतानाही त्या तक्रारींचे पुढे काय झाले, त्यावर कोणती चौकशी झाली आणि त्यातून काय निष्पन्न झाले, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

नेवाशातील विविध प्रश्नांवर अन्याय-अत्याचाराविरोधात आवाज उठविणारे अनेक जण या वृक्षघोटाळा प्रकरणावर मात्र मौन बाळगत असल्याची चर्चाही आता नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमके काय घडले, तक्रारींची काय कार्यवाही झाली आणि दोषींवर काही कारवाई झाली का, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

 

 

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!