spot_img
spot_img

सामाजिक प्रवाहात येण्यासाठी देहविक्री करणाऱ्या महिलांनी मतदार नोंदणी करावी – प्रांताधिकारी सावंत पाटील

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा) :- भारतीय राज्यघटनेत सर्व लोक समान असून लोकशाहीत राष्ट्रपती आणि सामान्य नागरिक यांना एकच मत देण्याचा अधिकार आहे. या एका मताद्वारे मतपेटीतून लोकप्रतिनिधी निवडले जातात. त्यामुळे सामाजिक प्रवाहात येण्यासाठी देहविक्री करणाऱ्या महिलांनी सुद्धा मतदार यादीत नाव नाव नोंदवणे गरजेचे असून हा राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे असे मत श्रीरामपूर विभागाचे प्रांताधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी किरण सावंत पाटील यांनी व्यक्त केले. ते श्रीरामपूर येथील स्नेहालय संचालित स्नेहज्योत युनिट – २ व मतदार नोंदणी कार्यालय यांच्या पुढाकाराने आयोजित मतदार देहविक्री व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी विशेष मतदार नोंदणी शिबिरात बोलत होते. यावेळी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, स्नेहालयचे ॲड . प्रसन्ना बिंगी उपस्थित होते.

याप्रसंगी प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांनी मतदार नोंदणी व विविध शासकीय योजनांची माहिती देऊन देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी त्या कशा राबवता येईल याची माहिती दिली. तर येत्या आठ दिवसांत पुरवठा व संजय गांधी निराधार योजनेच्या कर्मचाऱ्यांना घेऊन विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी ऍड. प्रसन्ना बिंगी यांनी महसूल प्रशासनाचे कायम सहकार्य मिळत असून देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी रेशनकार्ड, आधार कार्ड, जातीचे दाखले, हक्काचे घरकूल मिळावे यासाठी प्रयत्न करावे असे प्रांताधिकारी यांना आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तलाठी राजेश घोरपडे, इम्रानखान इनामदार, कोतवाल तुळशीराम शिंदे, गणेश बिरदवडे, निवडणूक शाखा सहायक संदिप पाळंदे, प्रितेश तांदळे, बीएलओ दत्तू पोपेरे, शगुफ्ता बागवान, विपुल गागरे, स्नेहज्योत युनिटच्या कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!