नेवासा फाटा( जनता आवाज वृत्तसेवा ):- ब्रह्मलीन 1008 बालब्रम्हचारीजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री सिद्धेश्वर मंदिर जुने टोका ता नेवासा येथे बुधवार दि 20 डिसेंबर 2023 रोजी श्री बालयोगी परमहंस महेश्वरानंदजी महाराज यांचा मठाधिश विराजमन सोहळा होणार आहे.त्यासाठी राज्यभरातून संत,महंत उपस्थित राहणार आहेत.
बालयोगी परमहंस महेश्वरनंदजी यांची मठाधिपती निवड झाल्याबद्दल आ शंकरराव गडाख मित्रमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला याप्रसंगी बाळासाहेब पाटील संचालक मुळा सह साखर कारखाना, कैलास झगरे सरपंच,संदीप सुडके सरपंच,वसंतराव डावखर,संतोष फिरोदिया व्हा चेअरमन खरेदी विक्री संघ,राहुल राजळे,सरपंच राहुल लकारे काकासाहेब खंडागळे उपसरपंच,,दिलीप शेलार,कैलास खंडागळे, माधवराव शिंदे,रमेश गंगुले,भारत गवळी,संतोष गंगुले,प्रशांत डावखर,महेश मते आदी उपस्थित होते.



