spot_img
spot_img

वडाळा महादेव येथे विजेच्या तारांची घर्षण होऊन सात एकर ऊस जळून खाक वर्षभरात दुसरी घटना

वडाळा महादेव( जनता आवाज वृत्तसेवा ):-  श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील अशोक सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक श्री कैलास सिताराम पवार यांच्या मालकिचे वडाळा महादेव – खोकर शिवारात गट नं २३३ क्षेत्र असुन सदर ठिकाणी ऊस लागवड केलेली आहे सदरचे ऊसाचे पिक हे जोमात असुन परिसरातील शेतीमधुन विजेच्या तारांच्या माध्यमातून वीज पुरवठा सुरू असतो तरी या ठिकाणी विजेच्या तारेचे घर्षण निर्माण होऊन विजेचे लोळ निर्माण झाले 

यामुळे शेतकरी सुजित कैलास पवार तसेच प्रवीण कैलास पवार यांच्या मालकीचे सात एकर उसाचे क्षेत्र जळून खाक झाले आहे

येथील परिसरातील श्री उघडे हे नेहमी प्रमाणे शेताशेजारून जात असताना संबंधित प्रकार त्यांच्या लक्षात आला घटनेचे गांभीर्य ओळखत श्री उघडे यांनी श्री कैलास पवार तसेच माजी सरपंच सचिन पवार .इंजिनीयर सुजित पवार .यांना घटनेची माहिती दिली तसेच आगीचे लोळ वाढत असल्याने अग्निशमन बंब यांना पाचारण करण्यास सांगितले यावरून परिसरातील नागरिकांनी आरडाओरड करत घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला परंतु आगीने उग्र रूप धारण केल्याने आगीचे लोळ मोठ्या प्रमाणावर वाढत होते  येथील सामाजिक कार्यकर्ते सुनिल पवार यांनी उघडे वस्ती व सिन्नरकर पवार वस्ती येथील नागरीकांना मदतीसाठी फोनवरून माहिती दिली

मोठ्या प्रमाणावर आगीचा तांडव सुरू असल्याने अग्निशमन बंब पोहोचू पर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते काही दिवसापूर्वी याच ठिकाणी अशाच प्रकारे नुकसान झाल्याने येथील शेतकरी श्रीरामपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष श्री संजय फंड तसेच श्री कैलास पवार यांनी संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी यांना याविषयी माहिती दिली होती

वेळोवेळी माहिती देऊनही संबंधित गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने ऊस शेती पिकाचे प्रचंड असे नुकसान झाले आहे वारंवार अशाच प्रकारच्या घटना घडत असल्याने वडाळा महादेव येथील शेतकरी नागरीकांमधून प्रचंड नाराजीचा सूर निघत आहे

यावेळी श्री कैलास पवार ग्रामपंचायत सदस्या सौ चंद्रकला पवार इंजिनियर सुजित पवार श्री प्रवीण पवार यांनी याबाबत

सदर दुर्घटनेमध्ये प्रचंड असे नुकसान झाले असून भरून न येणारे असल्याची माहिती दिली तसेच अनेक वेळा माहिती देऊनही टाळाटाळ करत असल्यानेच आमचे नुकसान झाले असल्याचे श्री पवार यांनी सांगितले.

रिसरात महावितरणच्या भोंगळ्या कारभारामुळे येथील वायरमन श्री सुनील पवार यांनाही मृत्यू ओढवला आहे सणासुदीच्या तोंडावरच दुर्घटना घडल्याने नागरीकामधुन हळहळ व्यक्त करण्यात येत आहेयाबाबत श्री कैलास पवार यांनी घटनेची वरिष्ठ स्तरावरून चौकशी व्हावी तसेच संबंधित नुकसानीस कारणीभूत ठरलेल्या दोषी कर्मचारी यांचेवर कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे – ]

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!