वारी( जनता आवाज वृत्तसेवा):-वारी येथील आप्पासाहेब कचरु लांडगे ( वय ६० ) यांचे स्वतःचे गव्हाचे हार्वेस्टर मशिन होते.गहू सोंगणीचा हंगाम सुरू असल्याने लांडगे यांचे मशीन सातत्याने सुरू होते. दि. १ एप्रिल २०२५ रोजी सकाळी एका शेतकऱ्याचे गव्हाचे हार्वेस्टिंग करून आप्पासाहेब हे दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतात जाण्यासाठी निघाले होते.
परंतु मशिनचा ब्लेट बसवत असताना गळ्यात असलेले उपरणे ब्लेटमध्ये गुंतले जाऊन त्यांना गळ्याला आवळले गेले आणि त्या ब्लेटमध्ये अडकून आप्पासाहेब लांडगे यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला. त्यांना कोपरगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते परंतु तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा, मुलगी , दोन भाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे.



