spot_img
spot_img

विराट हिंदू संमेलनास महिला वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – सौ. देवयाणी काळे

श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा) :येथील थत्ते मैदानावर सोमवार, दि. १३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनास हिंदू माता, भगिनी, युवतीं व विद्यार्थिनींनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महिला निमंत्रक सौ. देवयाणी केशवकुमार काळे यांनी केले आहे.

या संमेलनास श्रीरामपूर तालुक्याचे भूमिपुत्र तसेच श्रीराम मंदिर अयोध्या व श्रीकृष्ण मंदिर मथुराचे मार्गदर्शक प.पू. स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज, सरला बेट गोदाधामचे मठाधिपती ह.भ.प. रामगिरीजी महाराज तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र संघचालक डॉ. जयंतीभाई भाडेसिया हे प्रमुख मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

संमेलनापूर्वी दुपारी 3 वाजता येथील हनुमान मंदिरापासून मिरवणुकीचेही आयोजन करण्यात आले आहे. श्रीरामपूर शहर, तालुका व परिसरातील महिला वर्गाने एकजुटीने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सौ. काळे यांनी केले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!