spot_img
spot_img

काका ट्रस्ट आयोजित डॉ. कुमार विश्वास यांच्या संगीतमय रामकथेची तयारी पूर्णत्वास श्रीराम मंदिराचा भव्य सेट ठरणार प्रमुख आकर्षण

अहिल्यानगर(जनता आवाज वृत्तसेवा): – माजी आमदार स्व.अरुणकाका जगताप यांच्या स्मरणार्थ प्रसिद्ध कवी आणि रामकथाकार डॉ. कुमार विश्वास यांच्या ‘अपने-अपने राम’ या संगीतमय रामकथेचे आयोजन अहिल्यानगरमध्ये काका ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. उद्या रविवार दिनांक १९ रोजी राम कथेला सुरवात होणार असून मंगळवार दि. २१ पर्यंत दररोज सायंकाळी ६ ते ९ यावेळेत नगर शहरातील आनंदधाम रोड वरील राष्ट्रीय पाठशाळेच्या भव्य प्रांगणात ही संगीतमय रामकथा होणार आहे. शहरातील सर्वात मोठ्या ठरणाऱ्या या धार्मिक सोहळ्याची तयारी पूर्णत्वास आली आहे. या सोहळ्यासाठी परिसरात ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या असल्याने अहिल्यानगर शहर राममय झाले आहे, अशी महिती नगरसेवक विकी जगताप यांनी दिली.

अधिक माहिती देतना इंजिनिअर अनिल मुरकुटे म्हणाले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप व आ.संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्यदिव्य सोहळ्याची तयारी अंतिम टप्यात आली आहे. देशात लोकप्रिय असलेले रामकथाकार डॉ. कुमार विश्वास यांच्या संगीतमय राम कथेसाठी सुमारे १ लाख स्क्वेअर फुटाचा जर्मन हँगर पद्धतीचा भव्य मंडप उभारण्यात आला असून हजारो भाविकांसाठी खुर्च्यांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे. कथाकार डॉ. कुमार विश्वास यांच्यासाठी भव्य व आकर्षक व्यासपीठ उभारण्यात आले असून त्यावर श्रीराम मंदिराचा आकर्षक व भव्य सेट उभारण्यात आला आहे. सेटच्या मध्यामाभागी श्रीराम पंचायतनच्या मुर्त्या ठेवण्यात येणार आहेत. उपस्थित सर्व भाविकांना रामकथा व्यवस्थित पाहता व ऐकता येईल अशी उत्तम व्यवस्था करण्यात आली असूनजागोजागी मोठ्या एलईडी स्क्रीन बसवण्यात आल्या आहेत.

अजित जगताप यांनी सांगितले, रामकथाकार डॉ. कुमार विश्वास यांच्या संगीतमय राम कथेसाठी सर्व भाविकांसाठी मोफत आहे. या सोहळ्यास उपस्थित असलेल्या हजारो भाविकांची तिन्ही दिवस महाप्रसादाची व्यवस्था काका ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे. यासाठी कार्यक्रम स्थळाच्या समोरील भागात वेगळी भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच भाविकांच्या दुचाकी व चारचाकी गाड्यांसाठी कार्यक्रम स्थळा जवळील आयटीआय कॉलेजचे मैदान, पॉलिटेक्निक कॉलेज मैदान, रयत शिक्षण संस्थेचे मैदान आनंदधाम शेजारील भक्तनिवास जवळ आदी ठिकाणी सुटसुटीत वाहन तळाची व्यवस्था करण्यात आली आहे.

अनुप काळे म्हणाले, प्रख्यात रामकथाकार डॉ.कुमार विश्वास संपर्ण लोकप्रिय असून त्यांनी रामकथेच्या माध्यमातून देशवासीयांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे कुमार विश्वास यांच्या रामकथेच्या अद्भुत अनुभवाची अनोखी पर्वणी नगरकर भाविकांना मिळाली आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा.

माजी आमदार स्व.अरुण जगताप यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त होणाऱ्या या ऐतिहासिक रामकथा सोहळ्यात सर्व भाविकांनी सहभागी व्हावे व तिन्ही दिवस महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन काका ट्रस्टचे राजेश भंडारी, गणेश गोंडाळ, शशीकांत घीगे आदींनी केले आहे.

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!