spot_img
spot_img

कलाम्स व्हिजन अकॅडमीचे ‘जेईई मेन’ मध्ये घवघवीत यश  पहिल्याच बॅचचा उत्कृष्ट निकाल; ४ विद्यार्थी जी  अँडव्हान्स्ड  साठी पात्र

लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):-राहाता तालुक्यातील लोणी येथील डॉ. कलाम्स व्हिजन अकॅडमीने JEE परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. अकॅडमीच्या एकूण ५० विद्यार्थ्यांपैकी ४ विद्यार्थ्यांची JEE Advanced परीक्षेसाठी निवड झाली असून हा अकॅडमीसाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.

रोजमीन शेख (९५.३४%), ओमराज विखे (८६.६६%), नील सोमवंशी (८५.९३%) आणि सिध्दी घोगरे (८५.८६%) या विद्यार्थ्यांनी दोन वर्ष सातत्याने मेहनत घेत पंचक्रोशीत दैदिप्यमान कामगिरी बजावली आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक परीक्षांबाबत नवचैतन्य निर्माण झाले आहे.

अकॅडमीच्या पहिल्याच बॅचचा इतका उत्कृष्ट निकाल लागल्याने परिसरातील पालकांनी समाधान व्यक्त करत अकॅडमीचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या यशानिमित्त विजयी मिरवणूक काढून कौतुक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या यशामागे विषय शिक्षकांचे मोलाचे योगदान लाभले आहे. गणित विषयासाठी सोनू कुमार, केमिस्ट्रीसाठी अमित ठाकूर आणि फिजिक्ससाठी विरेंद्र राठोड यांनी विद्यार्थ्यांना अचूक व परिणामकारक मार्गदर्शन केले.

अकॅडमीच्या अध्यक्षा स्वाती खर्डे मॅडम तसेच को-फाउंडर गणेश जेजुरकर सर यांनी आपल्या परिसरात JEE आणि NEET परीक्षांच्या तयारीची मुहूर्त मेड रोवली आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे आता विद्यार्थ्यांना मोठ्या शहरात जाऊन महागड्या कोचिंगचा पर्याय शोधण्याची गरज उरलेली नाही, ही बाब पालक आणि विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक ठरली आहे.

या यशामुळे डॉ. कलाम्स व्हिजन अकॅडमीने शिक्षण क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला असून भविष्यातही अशीच यशस्वी कामगिरी करण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!