अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी मुम्मका सुदर्शन यांची नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या गृह विभागाकडून या बदल्यांचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले.
सोमनाथ घार्गे यांनी आपल्या कार्यकाळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विविध प्रभावी उपाययोजना राबवल्या. गुन्हेगारीवर नियंत्रण, संघटित गुन्हेगारीविरोधातील कारवाई तसेच जनतेशी संवाद साधण्यावर त्यांनी विशेष भर दिला होता. त्यांच्या बदलीमुळे पोलीस दलात आणि नागरिकांमध्येही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
नवीन एसपी म्हणून पदभार स्वीकारणारे मुम्मका सुदर्शन हे कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी विविध ठिकाणी उल्लेखनीय कामगिरी बजावली असून, त्यांच्या नियुक्तीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेला आणखी बळकटी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून मुम्मका सुदर्शन हे पदभार स्वीकारणार असून, जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न, गुन्हेगारी नियंत्रण आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी ते कोणत्या नव्या योजना राबवतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




Total Users : 614445