spot_img
spot_img

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन

अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा ):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त चौंडी (ता.जामखेड) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकास भेट देऊन अभिवादन केले. यावेळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही अभिवादन केले.

याप्रसंगी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी मुख्यमंत्र्यांसह उपस्थित मान्यवरांनी अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक येथे जाऊन दर्शन घेतले.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!