अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा):- नगर येथील सायबर पोलीस स्टेशन येथे दाखल असणाऱ्या सॉफ्टवेअर चोरी तसेच फसवणूक प्रकरणातील आरोपी शॉप मेटकंपनीचे संचालक मंदार पाथरीकर ,शैला केदार व पी आर एम कंपनीचे पूर्वीचे कर्मचारी मुकुंद दायमा व जालिंदर गमे यांचे अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळण्याचे आदेश पारित केले.
याबाबत सविस्तर वृत्त असे नितीन गोपालदास भराडीया या पी आर एम सॉफ्ट सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या धोरण अधिकाऱ्यांनी अहिल्यानगर येथील सायबर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादी वरून सदरील आरोपी यांचे विरुद्ध सायबर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम 3 (5 )316 (4 )318( 4 )336 (3 )व माहिती तंत्रज्ञान अधिनियम चे कलम 43 66 66 (d)72 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता
सदरील फिर्यादीमध्ये सदरील आरोपी यांनी सर्वांनी संगणमताने सदरील भराडिया हे काम करत असलेल्या कंपनीचे की वर्ड व सोर्स कोड तसेच त्याच्या कॉपी करून संगणमताने त्या माध्यमातून नव्याने दुसरे सॉफ्टवेअर तयार केल्या संदर्भाच्या प्राथमिक माहितीचा आधारे त्यांनी फिर्याद दाखल केलेली होती सदरची फिर्याद दाखल झाल्यानंतर आरोपी मंदार पात्रीकर तसेच शैला केदार व पी आर एम कंपनीचे पूर्वीचे कर्मचारी जालिंदर गमे व मुकुंद दायमा यांनी अटकपूर्वक जामीन मिळण्यासाठी जिल्हा न्यायालयांमध्ये जामीन अर्ज दाखल केला होता.
प्रथमतः जिल्हा न्यायालयाने सदरचा जामीन अर्ज नामंजूर केला होता त्यानंतर सदरील आरोपी यांनी माननीय नामदार उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे देखील जामीन मिळणे साठी विनंती अर्ज केलेला होता सदरचा अर्ज माननीय नामदार उच्च न्यायालयाने पुन्हा जिल्हा न्यायालय अहमदनगर यांचेकडे फेर चौकशीसाठी पाठवलेला होता त्यावर अंतिमतः युक्तिवाद होऊन नव्याने जिल्हा न्यायाधीश के एस कुलकर्णी यांनी आदेश पारित करून सदरील मूळ फिर्यादी पीआरएम कंपनीच्या वतीने विधीज्ञ गोरक्ष पालवे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून सदरील अर्जदार आरोपी यांचे जामीन अर्ज नामंजूर करण्याचा आदेश पारित केलेला असून त्यांच्या अटकेची आवश्यकता असल्याची बाब आदेशामध्ये अधोरेखित केलेली आहे.
मूळ फिर्यादी पीआरएम शॉप मेट कंपनीच्या वतीने विधीज्ञ श्री गोरक्ष पालवे व विधिज्ञ श्री अमित टकले यांनी युक्तिवाद केला त्यांना एडवोकेट गुरविंदर पंजाबी सागर गरजे रोहित बुधवंत राहुल दहिफळे विशाल वांढेकर धनश्री खेतमाळीस रोहित चांडवले विवेक बडे पुष्कर बिडवाई प्रवीण निंबाळकर विवेकानंद बडे तेजस राख भक्ती तमनर बाळकृष्ण गीते यश केकान यांनी सहाय्य केले




Total Users : 607039