राहुरी(जनता आवाज वृत्तसेवा):-राहुरी तालुक्यातील कोळेवाडी येथे एका विवाहित महिलेने आपल्या दीड वर्षाच्या मुलाला फाशी देत स्वतःनेही गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,आशा सूर्यभान आंबेकर (वय ३१) यांनी आपला मुलगा शिवांश (वय दीड वर्ष) या मुलासह राहत्या घरी दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल रामनाथ सानप यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच तपासासाठी फॉरेन्सिक पथक देखील घटनास्थळी पोहोचले असून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, दोन्ही मृतदेह रवी देवगिरे यांच्या रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस शोध घेत आहेत.
या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहेत.




Total Users : 607023