शेवगाव (जनता आवाज वृत्तसेवा):- शेवगाव पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी करत १ गावठी कट्टा, २ जिवंत काडतुसे, १ मॅग्झीन असा एकुण २०,६००रु किंमतीचा मुद्देमालसह आरोपी जेरबंद करण्यात शेवगाव पोलिसांना यश आलं आहे
काल रात्री १० वा चे सुमारास पोनि मोहन बोरसे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, बोधेगाव ते हातगाव जाणारे रोडवरील हॉटेल अमरप्रित, बोधेगाव येथे असणाऱ्या एका इसमाकडे एक गावठी बनावटीचा कट्टा आहे
अशी माहीती मिळताच पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी पोलीस स्टेशनचे पोसई बाजीराव सानप, पोकॉ 03/ शाम गुंजाळ, पोकों 829/राहुल खेडकर, पोकॉ/510 एकनाथ गर्कळ, पोकॉ/1934 प्रशांत आंधळे यांना सदर ठिकाणी जावुन खात्री करण्यासाठी पाठविले. पोसई बाजीराव सानप यांनी दोन पंचाना बोलावुन बातमीतील हकीगत समजावुन सांगीतली आणि कारवाई करणेकरीता सोबत येण्यास कळविले असता दोन्ही पंचानी होकार दिल्यानंतर त्यांना सोबत घेवुन शेवगाव पोलीस स्टेशन येथुन रवाना होवुन बोधेगाव येथील हॉटेल अमरप्रित येथे दि.04 रोजी 5 वाजता जावुन खात्री केली असता सदर हॉटेलमध्ये एक इसम उभा असलेला आम्हाला दिसला. त्यानंतर आम्ही आमचा व पंचाचा परिचय करून देवुन त्याला त्याचे अंगझडती घेण्याचा कायदेशीर उद्देश समजावुन सांगुन सदर इसमाला त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव शाकीर बशीर शेख वय 34 वर्षे धंदा मजुरी रा. बोधेगाव ता. शेवगाव जि. अहिल्यानगर असे सांगीतले. त्यानंतर आम्ही पोलीस स्टॉफ व पंच यांनी अंगझडती घेतली असता सदर इसमाचे कमरेला एक गावठी कट्टा, एक मॅगझीन व ०२ जिवंत काडतुस मिळून आले. सदर मिळुन आलेल्या अग्णीशश्राबाबत वाहनातील ईसमांना विचारना केली असता त्यांनी काहीएक समाधानकारक उत्तर दिले नाही. तसेच सदर अग्णीशस्त्रा बाळगण्याचा कोणताही वैध परवाना त्यांचेकडे नसलेबाबत सांगीतले. सदरच्या कार्यावाहीत खालील प्रमाणे आरोपीच्या अंगझडतीमध्ये मुददेमाल मिळुन आला आहे.
20,000 रु कि.चे देशी बनावटीचा एक गावठी कटटा जु.वा.किं.अं. 500 रु कि.चे स्टीलचे मॅक्झीन जु.वा.किं.अं.100 रु किं.चे 02 जिवंत राऊंड (काडतुस) जु.वा.किं.अं.असा 20,600 /- एकूण किंमत येणे प्रमाणे वरील मुद्देमाल दोन पंचाचे समक्ष जप्त करुन सदर शाकीर बशीर शेख वय 34 वर्षे धंदा मजुरी रा. बोधेगाव ता. शेवगाव जि. अहिल्यानगर याआरोपी विरुद्ध पोकॉ/03 शाम बाबासाहेब गंजाळ यांचे फिर्यादी वरुन शेवगाव पोलीस स्टेशन गु.र.नं. 560/2026 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे दिनांक 04/07/2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन अहिल्यानगर, मा. अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे अहिल्यानगर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू सो उपविभाग शेवगांव यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. मोहन बोरसे सो. पोसई बाजीराव सानप, पोकों शाम गुंजाळ, पोकों प्रशांत आंधळे, पोकॉ राहुल खेडकर, पोकों एकनाथ गर्कळ, पोकों ईश्वर बेरड, पोकों वसंत वैद्य, पोकों राजु बडे, पोकों सचिन पिरगळ, पोकों धनेश्वर पालवे यांनी केली असुन गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सानप हे करत आहेत



