spot_img
spot_img

शिक्षणमहर्षी घाडगेपाटलांचे कार्य पुन्हा उजळले प्रथम पुण्यस्मरणात मान्यवरांकडून शिक्षणमहर्षींना श्रद्धांजली; गरिबांना दिला ‘आनंदाचा शिधा’ तर गुणवंतांचाही केला गौरव

नेवासा फाटा( जनता आवाज वृत्तसेवा) : – ज्ञानसेवा, जनसेवा आणि समाजसेवेचा वसा जपणारे त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे संस्थापक शिक्षणमहर्षी साहेबरावजी घाडगेपाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण सोहळा तेलकुडगाव येथे भावपूर्ण वातावरणात मोठ्या श्रद्धाभावाने संपन्न झाला. या सोहळ्याप्रसंगी शिक्षणमहर्षी घाडगेपाटलांच्या कार्याला पुन्हा उजाळा मिळाला आहे.

यावेळी बीड जिल्ह्यातील केज येथील वाणीभूषण समाधानजी महाराज शर्मा यांच्या हस्ते शिक्षणमहर्षी साहेबरावजी घाडगेपाटील यांच्या प्रतिमेस पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कीर्तनात समाधानजी महाराज शर्मा यांनी ‘ज्ञानसेवा हेच ईश्वरपूजन’ या विषयावर प्रभावी निरूपण केले. त्यांनी शिक्षणमहर्षी घाडगेपाटील यांच्या शिक्षण, समाजसेवा, ज्ञानमंदिर उभारणी तसेच जलमंदिरासारख्या उपक्रमांचे कौतुक करत त्यांच्या कार्याचा गौरव केला.

पुण्यस्मरण दिनानिमित्त त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानतर्फे गरजू व गोरगरीब कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्यात आला. तसेच देशाचे नाव जागतिक स्तरावर पोहोचवणाऱ्या वेदांत वाघमारे यांचा एक लाख रुपयांचा धनादेश देऊन गौरव करण्यात आला. महाराष्ट्र कबड्डी संघाची कर्णधार वैष्णवी काळे हिलाही २५ हजार रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी आ. विठ्ठलराव लंघे, नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीता गडाख, ॲड. देसाई देशमुख, वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक बापूसाहेब पाटेकर, प्रभाकर शिंदे, नगराध्यक्ष करणसिंह घुले, नानासाहेब फाटके आदी मान्यवरांनी शिक्षणमहर्षी घाडगेपाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.

कार्यक्रमादरम्यान आ. विठ्ठलराव लंघे, सुनीता गडाख, देसाई देशमुख, नानासाहेब फाटके, पितांबर चव्हाण, डॉ. राजेंद्र आमले आणि लक्ष्मणराव नाकाडे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

या सोहळ्यास पंचगंगाचे प्रभाकर शिंदे, ॲड. स्नेहल चव्हाण पाटील, चेतन चव्हाण पाटील, डॉ. गौरव आमले पाटील, डॉ. श्रुती आमले पाटील, डॉ. एम. के. पवार संकुलाचे सचिव शिवाजीराव पवार, अधिरथ पवार, समन्वयका अनुराधा गोरे, वित्त व्यवस्थापक अनिता जाधव, राव काळे पाटील, दयाघन गटकळ पाटील, अरुण घाडगे पाटील, बाबुराव काळे, नामदेव घोडेचोर पाटील, ज्ञानेश्वर काळे पाटील, काकासाहेब काळे पाटील, भानुदास गटकळ पाटील, महेशराजे काळे पाटील, सुधाकर राजहंस, दीपक घाडगे पाटील, अरविंद घाडगे पाटील, सुरेश काळे, बालकनाथ काळे पाटील, शिवाजीराव पवार, ॲड. सचिन घोडेचोर पाटील, हभप श्रीधर घाडगे महाराज, हभप नामदेव महाराज घाडगे, हभप अमोल महाराज घाडगे, हभप महेश महाराज घाडगे, प्रशासक मनीषा राऊत, प्राचार्य सोपानराव काळे, प्राचार्य भाऊसाहेब दुधाडे, दत्तात्रय वांढेकर, भाऊसाहेब गाढवे, शिवाजीराव काटे, बाळासाहेब कोकरे, नामदेव ताके, पत्रकार सुधीर चव्हाण, शाम मापारी, चंद्रकांत दरंदले यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

नेवासा परिसरातील नागरिक, हितचिंतक, ग्रामस्थ तसेच वसतिगृहातील पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिक्षणमहर्षी साहेबरावजी घाडगेपाटील यांच्या कार्याला अभिवादन केले. यावेळी पसायदानने कार्यक्रमाची सांगता झाली.

नेवासा परिसरातील नागरिक, हितचिंतक, ग्रामस्थ तसेच वसतिगृहातील पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या तेलकूडगाव, नेवासा फाटा, शेवगाव आणि ढोर जळगाव येथील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोकराव गाढे आणि लक्ष्मण दळे यांनी केले. तर विश्वस्त चेतन चव्हाण यांनी आभार मानले.

ॲड. सुमती घाडगे पाटील झाल्या भावूक

दरम्यान, संस्थेच्या अध्यक्षा ॲड. सुमती साहेबराव घाडगे पाटील यांनी शिक्षणमहर्षी घाडगे पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी उपस्थित मान्यवर, नातेवाईक, हितचिंतक व नागरिकांचे त्यांनी आभार मानले व आपल्या भावना व्यक्त करताना त्यांना अश्रू अनावर झाले आणि काही क्षण त्यांचा कंठ दाटून आला. उपस्थितांनाही हा क्षण अत्यंत भावूक करणारा ठरला.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!